• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

अनुभव घेऊन ज्ञानार्जन कधीही उत्तम !

क.ब.चौ.उमवि आंतर जिल्हा युवा आदान प्रदान कार्यक्रम प्रसंगी - डॉ केतकी पाटील यांचे प्रतिपादन.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
February 18, 2026
in जळगाव, शैक्षणिक
अनुभव घेऊन ज्ञानार्जन कधीही उत्तम !
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : मेरा भारत जळगाव, राष्ट्रीय सेवा योजना, क.ब.चौ.उमवि आंतर जिल्हा युवा आदान प्रदान कार्यक्रम अंतर्गत विद्यापीठात युवकांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी डॉ.केतकी पाटील फाऊंडेशच्या संचालिका डॉ.केतकी पाटील यांनी मार्गदर्शन करतांना अनुभव घेऊन ज्ञानार्जन कधीही उत्तम असल्याचे प्रतिपादन केले. सदर कार्यक्रम १८ ते २२ फेब्रुवारी दरम्यात होत आहे. हा कार्यक्रम युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय भारत सरकार अंतर्गत आयोजित करण्यात आला होता. यात प्रा.सुजानी व प्रा.प्रणाली यांच्या नेतृत्वात मुंबई येथील सुमारे ४० युवा सहभागी झाले.

या वेळी मंचावर डॉ. केतकी पाटील, जिल्हा युवक अधिकारी अभिषेक चौरे, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, क.ब.चौ. उमवि राष्ट्रीय सेवा योजना चे संचालक डॉ.व्ही.एम.रोकडे उपस्थित होते. कवयत्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आणि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्व्लन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अभिषेक चौरे यांनी आंतर जिल्हा युवा आदान प्रदान कार्यक्रम अंतर्गत विद्यापीठात युवकांसाठी कार्यक्रमाचे महत्व विशद केले. तर डॉ. केतकी पाटील यांनी युवकांना मार्गदर्शन करतांना सांगितले कि, बहिणाबाई या अशिक्षित होत्या पण जीवनातील अनुभवातून त्यांनी कविता केल्या. अनुभव घेऊन शिकण्यासाठी तुम्ही इकडे आले आहात. ग्रामीण भागात सण, उत्सव, महापुरुषांच्या जयंती मोठया प्रमाणात साजऱ्या होतात. यानिमित्ताने लोक एकत्र येतात. मेरा युवा भारत अंतर्गत आयोजित या कार्यक्रमामुळे शहरी भाग आणि ग्रामीण भाग यांच्या वैचारिक व सांस्कृतिक आदान प्रदान साठी पूल निर्माण होणार आहे असे सांगिले.

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, क.ब.चौ. उमवि राष्ट्रीय सेवा योजनाचे संचालक डॉ. व्ही एम .रोकडे यांनी देखील मार्गदर्शन केले. या प्रसंगी सहभागी युवकांना शूज, ट्रॅकसूट, पाणी बॉटल असलेली किट मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आली. यावेळी सहभागी युवकांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.

या उपक्रमांतर्गत हे युवक पाल सह जळगाव जिल्यातील अनेक स्थळांना भेटी देऊन येथील वातावरण, संस्कृती, खाद्य संस्कृती, ऐतिहासिक स्थळे ,ग्रामपंचायत आदींना भेट देऊन माहिती जाणून घेणार आहेत.

बातमी शेअर करा !
Tags: आंतर जिल्हा युवा आदान प्रदान कार्यक्रमक.ब.चौ. उमविडॉ. केतकी पाटीलमेरा भारत जळगावयुवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालयराष्ट्रीय सेवा योजना
Previous Post

जिल्ह्यात २०३ शेतकऱ्यांची आत्महत्या !

Next Post

आठ दिवसात समस्यांचे निरसन करण्याचे आदेश !

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
आठ दिवसात समस्यांचे निरसन करण्याचे आदेश !

आठ दिवसात समस्यांचे निरसन करण्याचे आदेश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif