• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जिल्हा

पाचोरा–जामनेर रेल्वे मार्गाच्या भूसंपादनावर शेतकऱ्यांचा आक्षेप!

कमी मोबदल्यास शेतकऱ्यांचा नकार ; रेल्वे विभागाशी चर्चा करून तोडगा काढू – केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
February 8, 2026
in जिल्हा, विकासकामे
पाचोरा–जामनेर रेल्वे मार्गाच्या भूसंपादनावर शेतकऱ्यांचा आक्षेप!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : पाचोरा–जामनेर नवीन रेल्वे मार्गासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादन टेंडर प्रक्रिया झालेली असली. तरी भूसंपादनासाठी ठरविण्यात आलेल्या मोबदल्यावर शेतकऱ्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. जमीन संपादनासाठी करण्यात आलेले व्हॅल्युएशन हे रेडीरेकनर दरानुसार असून ते अत्यंत कमी असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे इतक्या कमी दरात जमीन देणे शक्य नसल्याची ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.

 

या पार्श्वभूमीवर आज महत्त्वाची बैठक घेण्यात आली. बैठकीनंतर केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. त्या भाजप कार्यालय जीएम फाउंडेशन येथे आयोजित पत्र परिषदेत बोलत होत्या. नवराज्य लाईव्हचे संपादक योगेश सुने यांनी पाचोरा– जामनेर रेल्वे मार्ग बाबत.विचारलेल्या प्रश्ना वर त्या बोलत होत्या. यावेळी खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, आ. राजू मामा भोळे, जळगाव महापालिकेच्या महापौर दीपमाला काळे, भाजप शहरजिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष (पूर्व) चंद्रकांत बाविस्कर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष (पश्चिम ) डॉ राधेश्याम चौधरी ,उपमहापौर मनोज चौधरी, आदी उपस्थित होते.

 

मंत्री खडसे म्हणाल्या की, पाचोरा–जामनेर रेल्वे मार्गासाठी काही ठिकाणी भूसंपादन झाले असले तरी बहुसंख्य शेतकऱ्यांची जमीन संपादनासाठी देण्याची मानसिकता नाही. शेतकऱ्यांचा स्पष्ट आग्रह आहे की, जमीन द्यायचीच झाल्यास ती केवळ मार्केट दरानेच दिली जाईल. मात्र सध्या ठरवण्यात आलेला मोबदला हा रेडीरेकनर दरानुसार असल्याने तो खूपच कमी पडत आहे, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे.

 

 

“शेतकऱ्यांची जमीन कमीत कमी संपादित होईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शक्य तिथे पर्यायी मार्ग, तांत्रिक बदल करून जमीन संपादन टाळण्यावर भर दिला जात आहे,” असेही मंत्री खडसे यांनी स्पष्ट केले. मात्र काही ठिकाणी भूसंपादन अपरिहार्य असल्याने शेतकऱ्यांचा विश्वास घेऊनच पुढील प्रक्रिया राबवली जाईल, असे त्यांनी सांगितले.

 

 

दरम्यान, भुसावळ–खंडवा रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणासाठीही भूसंपादनाचा प्रश्न प्रलंबित असल्याने त्या ठिकाणचे काम सध्या थांबले आहे. या दोन्ही महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांमुळे खानदेशाचा विकास वेगाने होणार असून, प्रवासी वाहतूक आणि औद्योगिक दळणवळणासाठी हे मार्ग अत्यंत महत्त्वाचे आहेत. मात्र भूसंपादनातील अडचणींमुळे प्रकल्प रखडत असल्याची वस्तुस्थिती आहे.

 

 

रेल्वे विभागाशी चर्चा करून लवकरात लवकर तोडगा काढणार

 

यासंदर्भात रेल्वे विभाग, महसूल प्रशासन आणि शेतकरी प्रतिनिधी यांच्यात लवकरच सविस्तर चर्चा करून व्यवहार्य तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन मंत्री रक्षा खडसे यांनी दिले. “विकास प्रकल्प आवश्यक आहेत, मात्र शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही. दोन्ही बाजूंचा समतोल राखूनच निर्णय घेतला जाईल,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

एकूणच, पाचोरा–जामनेर आणि भुसावळ–खंडवा हे दोन्ही रेल्वे प्रकल्प खानदेशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असले तरी शेतकऱ्यांच्या मोबदल्याचा प्रश्न सुटल्याशिवाय कामाला गती मिळणे अवघड असल्याचे सध्या चित्रआहे.

बातमी शेअर करा !
Tags: भूसंपादनभूसंपादन टेंडरराज्यमंत्रीरेल्वे मार्ग
Previous Post

विकसित भारत’ संकल्पात महाराष्ट्राचा हुंकार !

Next Post

भिरूड परिवारातर्फे संत गजानन महाराज यांचा प्रगटदिन उत्साहात!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
भिरूड परिवारातर्फे संत गजानन महाराज यांचा प्रगटदिन उत्साहात!

भिरूड परिवारातर्फे संत गजानन महाराज यांचा प्रगटदिन उत्साहात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif