• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

प्रेम केलं… पण ती निघाली तृतीयपंथी ! 

पिछा सोडवण्यासाठी पहुरच्या तरुणांकडून तृतीयपंथीचा खून; एलसीबीकडून आरोपीला ४८ तासांत बेड्या

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
February 7, 2026
in क्राईम, जिल्हा
प्रेम केलं… पण ती निघाली तृतीयपंथी ! 
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

प्रेम केलं… पण ती निघाली तृतीयपंथी !

पिछा सोडवण्यासाठी पहुरच्या तरुणांकडून तृतीयपंथीचा खून; एलसीबीकडून आरोपीला ४८ तासांत बेड्या

 

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यातील एरंडोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पद्मालय वनपरिक्षेत्रात एका महिलेचा अर्धवट जळलेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. या अंधाऱ्या खुनाचा छडा लावण्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून, अवघ्या ४८ तासांत आरोपीला जेरबंद करण्यात आले आहे. सदर महिला तृतीय पंथी असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून पिच्छा सोडत नसल्याने सदर आरोपीने हे कृत्य केल्याचे दिसून आले आहे.

 

४ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास पद्मालय ते नागदुली रस्त्यावरील जंगलात एका अज्ञात महिलेचा विद्रूप अवस्थेतील मृतदेह सापडला होता. ओळख पटू नये म्हणून आरोपीने महिलेचा चेहरा आणि छातीचा भाग ज्वलनशील पदार्थ टाकून पूर्णपणे जाळला होता. हे ठिकाण निर्जन आणि डोंगरदऱ्यांचे असल्याने तपास करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने ४ पथके तयार केली होती.

 

मृतदेहाच्या पायाच्या नखांवरील ‘मॅजंटा’ रंगाचे नेलपॉलिश आणि डाव्या नाकपुडीतील सोन्याची ‘मुरणी’ यावरून महिलेची ओळख पटवण्यास मदत झाली. मृतदेहावरील अळ्यांच्या वाढीवरून तज्ज्ञांनी या महिलेचा मृत्यू ३० किंवा ३१ जानेवारी रोजी झाल्याचा निष्कर्ष काढला.

 

गोपनीय माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी गोलू उर्फ स्वप्नील अशोक पाटील (वय २७, रा. पहूर, ता. जामनेर) याला ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्याने खुनाची कबुली दिली. मृत महिला ही तृतीयपंथी असून तिचे नाव आकाक्षा उर्फ अजय हेमराज गेड्रे (रा. सोनसरार, जि. राजनांदगाव, छत्तीसगड) असल्याचे निष्पन्न झाले. आकांक्षासोबत आरोपीचे प्रेमसंबंध होते.

 

त्यांच्यातील दोघांच्या प्रेम संबंधांमध्ये स्वप्निलने इच्छा सोड म्हणून तिला सांगितले होते. मात्र आकांक्षा ऐकत नव्हती. त्यामुळे त्याने तिला सुरत वरून बोलावले. त्यानंतर पद्मालयच्या जंगलात नेऊन रागाच्या भरात आरोपीने तिच्या डोक्यात प्रहार केला व ओढणीने गळा आवळून तिची हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने स्वतःच्या मोटारसायकलमधील पेट्रोल काढून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला होता.

 

ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, सोपान गोरे, शरद बागल, जितेंद्र वल्टे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे. या धाडसी कारवाईचे संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत आहे.

बातमी शेअर करा !
Tags: अंधाऱ्या खुनाचा छडातृतीय पंथी असल्याचेनागदुली रस्त्यावरील जंगलातपद्मालय वनपरिक्षेत्रात
Previous Post

महापौरपदी दीपमाला काळे तर उपमहापौरपदी मनोज चौधरी विराजमान! 

Next Post

विकसित भारत’ संकल्पात महाराष्ट्राचा हुंकार !

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
विकसित भारत’ संकल्पात महाराष्ट्राचा हुंकार !

विकसित भारत’ संकल्पात महाराष्ट्राचा हुंकार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif