नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव – मनपा पदाधिकाऱ्यांची मुदत संपल्याने गेल्यादिवसांपासून सुरू असलेली प्रशासक राजवट आज शुक्रवारी संपुष्टात आली. महापौर व उपमहापौर पदासाठी दोघांचे एकमेव अर्ज असल्याने सकाळी ११ वाजता महापौर पदासाठी भाजपच्या दीपमाला मनोज काळे यांचा एकमेव अर्ज असल्याने पिठासीन अधिकारी यांनी अर्ज मागे घेण्यासाठी पंधरा मिनिटाची मुदत दिली. त्यानंतर त्यांना भाजपाच्या महापौर घोषित करण्यात आले. त्यानंतर उपमहापौर पदासाठी शिवसेना शिंदे गटाचे मनोज चौधरी एकमेव अर्ज आल्याने पिठासीन अधिकारी यांनी अर्ज मागे घेण्यासाठी 15 मिनिटाचा कालावधी दिला. व त्यांनी अर्ज मागे न घेतल्याने त्यांना उपमहापौर घोषित करण्यात आले.
त्यानंतर नवीन पदाधिकारी कार्यभार हाती घेतील. २८ महिन्यांनंतर मनपात पुन्हा लोकप्रतिनिधींचे राज्य उदयास आले.
महापालिकेच्या सतराव्या महापौरांची निवड प्रक्रिया आज ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता सुरू झाली. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली महापौर व उपमहापौर
महापालिके बाहेर फटाक्यांचा जल्लोष.
दरम्यान महानगरपालिकेच्या महापौरपदी दीपमाला काळे व उपमहापौरपदी शिवसेनेचे मनोज चौधरी यांची बिनविरोध निवड घोषित झाल्यानंतर महानगरपालिकेच्या बिनविरोध निवड निवडीनंतर भाजप व शिवसेना महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.
यांनी केली निवड घोषित….
निवडीसाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, नगरसचिव सतीश शुक्ला यांच्यासह प्रमुख अधिकारी उपमहापौर पदासाठी सूचक विष्णू भंगाळे तर अनुमोदक विक्रम सोनवणे. महापौर पदासाठी मला मनोज काळे यांच्या अर्जाला सूचक सुचिता हाडा व अनुमोदक दीपक सूर्यवंशी हे होते तर त्यांच्या दुसऱ्या डमी अर्जाला सुचक दीपक सूर्यवंशी व अनुमोदक प्रकाश बालानी होते महापौर पदासाठी एकमेव अर्ज आल्याने महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध घोषि
त करण्यात आली







