• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home राजकारण

तळागाळातील कार्यकर्त्यांना बळ देणारे नेतृत्व हरपले.

आमदार. सुरेश भोळे यांची अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
January 31, 2026
in राजकारण
तळागाळातील कार्यकर्त्यांना बळ देणारे नेतृत्व हरपले.
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

तळागाळातील कार्यकर्त्यांना बळ देणारे नेतृत्व हरपले – आ. सुरेश भोळे यांची अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली

नवराज्य Live न्यूज नेटवर्क | जळगाव

तळागाळातील कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने बळ देणारे, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे अजितदादा आज आपल्यात नाहीत, ही महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अपूरणीय हानी आहे, अशा शब्दांत जळगाव शहराचे आमदार सुरेश दामू भोळे (राजुमामा) यांनी अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

आमदार भोळे म्हणाले की, अजितदादांच्या कार्यपद्धतीबद्दल ऐकून होतो; मात्र त्यांच्या सोबत प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळाल्याने ती कार्यपद्धती जवळून अनुभवता आली. प्रशासनावर असलेली त्यांची मजबूत पकड, कठीण परिस्थितीतही धाडसी व ठाम निर्णय घेण्याची त्यांची क्षमता आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांप्रती असलेली त्यांची संवेदनशीलता हे गुण प्रत्यक्ष पाहता आले, असे त्यांनी नमूद केले.

अजितदादांचे नेतृत्व हे केवळ राजकीय मर्यादांपुरते नव्हते, तर ते कार्यकर्त्यांसाठी प्रेरणास्थान होते. प्रत्येक कार्यकर्त्याला आपलेसे मानून त्याच्या पाठीशी उभे राहणारा नेता म्हणून अजितदादांची ओळख होती, असेही आमदार भोळे यांनी सांगितले.

अजितदादांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी असून त्यांच्या आठवणी आणि कार्य कायम स्मरणात राहील, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत अजितदादांना श्रद्धांजली वाहिली.

बातमी शेअर करा !
Tags: Ajitdada Ajitdada Death Ajitdada Shraddhanjali Suresh Bhole Jalgaon MLA Jalgaon News Maharashtra Politics
Previous Post

जीवाचे रान करणारा नेता हरवला..

Next Post

वाहतूक सुरक्षा सप्ताहात पोलिसांची हेल्मेट रॅली

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
वाहतूक सुरक्षा सप्ताहात पोलिसांची हेल्मेट रॅली

वाहतूक सुरक्षा सप्ताहात पोलिसांची हेल्मेट रॅली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

September 5, 2026
युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif