• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home राजकारण

जीवाचे रान करणारा नेता हरवला..

जैन उद्योगसमूहाचेअध्यक्ष अशोक जैन यांनी आठवणीतून व्यक्त केल्या संवेदना.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
January 30, 2026
in राजकारण
जीवाचे रान करणारा नेता हरवला..
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

जीवाचे रान करणारा नेता हरवला

जळगाव –  अजितदादा पवार अपघाती निधन ही वार्ता अत्यंत दु:खद आणि वेदनादायी आहे. नेहमी प्रसन्न, स्वागतशील आणि सर्वसामान्यांशी आपुलकीने संवाद साधणारे व्यक्तिमत्त्व म्हणून अजितदादा पवार ओळखले जात होते. स्वतःची खास कार्यशैली विकसित केलेले ते कर्तबगार आणि धाडसी नेतृत्व होते.

शिस्त, वेळेचे काटेकोर नियोजन आणि दिलेला शब्द कोणत्याही परिस्थितीत पाळण्याची बांधिलकी हे त्यांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य होते. राजकीय क्षेत्रात स्पष्टवक्तेपणा अडचणी निर्माण करतो, मात्र दादा नेहमीच धैर्यशील आणि कणखर राहिले.

 

जैन इरिगेशन व शेती क्षेत्रासाठी दादांचे योगदान

अजितदादा पवार हे जैन इरिगेशन सिस्टिम्सच्या विविध प्रकल्पांना नियमित भेटी देत असत. जळगाव दौऱ्यावर आले की पहाटेच जैन हिल्स येथे शेतीतील नवनवीन प्रयोगांची पाहणी करण्याची त्यांची खास परंपरा होती.

शेती संशोधन, जलसंधारण आणि शाश्वत विकास या विषयांवर श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्याशी दादांचा झालेला संवाद आजही आठवणींमध्ये ताजा आहे.

 

कांताई बंधारा : जलसंधारणाचे आदर्श उदाहरण

१६ ऑक्टोबर २०१३ रोजी कांताई बंधाऱ्याचे उद्घाटन अजितदादा पवार यांच्या हस्ते झाले होते. यावेळी त्यांनी म्हटले होते की,

“पावसाच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. योग्य व्यवस्थापनातून जलसंधारणाचा प्रश्न सोडवता येतो. कांताई बंधारा हा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (PPP) आधारित राज्यातील पहिलाच आदर्श प्रकल्प आहे.”

 

राज्य व देशासाठी अपूरणीय हानी

अजितदादा पवार यांच्या आकस्मिक जाण्याने केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या सार्वजनिक जीवनाची मोठी हानी झाली आहे. आपल्या कुटुंबातील सदस्य गमावल्याची वेदना प्रत्येकाला जाणवत आहे.

अजितदादा पवार यांना भावपूर्ण आदरांजली.

—

अशोक जैन

अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., जळगाव

 

जैन इरिगेशनच्या भेटीप्रसंगी अजित पवारांसोबत अशोक जैन, जयंत पाटील, अजित जैन, अतुल जैन, अभय जैन

बातमी शेअर करा !
Source: navarajylive
Via: अशोक जैन
Tags: अजितदादा पवारअजितदादा पवार अपघाती निधनअजितदादा पवार श्रद्धांजलीअशोक जैनकांताई बंधाराजलसंधारणजळगाव न्यूजजैन इरिगेशनमहाराष्ट्र राजकारण
Previous Post

पोलिस कवायत मैदानावर केसीईच्या चिमुकल्यांचे उत्कृष्ट पथसंचलन!

Next Post

तळागाळातील कार्यकर्त्यांना बळ देणारे नेतृत्व हरपले.

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
तळागाळातील कार्यकर्त्यांना बळ देणारे नेतृत्व हरपले.

तळागाळातील कार्यकर्त्यांना बळ देणारे नेतृत्व हरपले.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जंक फूड मुक्त होळीचा विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश!

जंक फूड मुक्त होळीचा विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश!

March 2, 2026
चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

March 2, 2026
खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

March 1, 2026
जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

March 1, 2026
खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

February 28, 2026
स्थायी सभापतीपदी डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण सभापतीपदी सिंधुताई कोल्हे बिनविरोध निवड!

स्थायी सभापतीपदी डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण सभापतीपदी सिंधुताई कोल्हे बिनविरोध निवड!

February 27, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif