• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

कॅन्सरचे वाढते प्रमाण चिंताजनक ; पर्यावरणाचे रक्षण करा!

बहिणाबाई महोत्सवात राष्ट्रीय वक्ते सत्यनारायण बाबा मोर्य यांचे प्रबोधन; विविध क्षेत्रातील कर्तबगारांचा सन्मान.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
January 26, 2026
in जळगाव, बहिणाबाई महोत्सव
कॅन्सरचे वाढते प्रमाण चिंताजनक ; पर्यावरणाचे रक्षण करा!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव – भरारी फाउंडेशन व क्रेडाई जळगाव आयोजित “बहिणाबाई महोत्सव ११ वे पर्व च्या तिसऱ्या दिवशी मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तबगार यांना “बहिणाबाई गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या सोहळ्याला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा सह विविध क्षेत्रातील नामांकित मान्यवर उपस्थित होते यावेळी राष्ट्रीय देशभक्त प्रख्यात प्रवक्ते सत्यनारायण बाबा मोर्य यांनी वाणीने उपस्थित यांना जागृती पर मार्गदर्शन केले.

 

महोत्सवात यांचा झाला सन्मान

समाजसेवेचा आणि आपल्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पुरस्कार त्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यात शैक्षणिक क्षेत्रातील नंदलाल गादिया, सामाजिक क्षेत्रातील राजेंद्र देशमुख, औद्योगिक क्षेत्रातील किशोर ढाके, आरोग्य क्षेत्रातील भारती काळे, सामाजिक क्षेत्रातील सरिता खाचने, पर्यावरण क्षेत्रातील वसंत पाटील, वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. निलेश चांडक आणि उद्योग क्षेत्रातील किरण बच्छाव यांना बहिणाबाई पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 

यांच्या हस्ते झाले पुरस्काराचे वितरण…

या पुरस्काराचे वितरण जिल्हाधिकारी रोहन घुगे उद्योजक रजनीकांत कोठारी माजी.आमदार मनीष जैन, अनिश शाह, डॉ पियुष दोशी,गोसेवक अजय ललवाणी, केशवस्मृती प्रतिष्ठानचे भरत अमळकर, क्रेडाइचे जिल्हाध्यक्ष दीपक सराफ, उद्योजक अनिल कांकरिया, उद्योजक रवींद्र लड्ढा, यांचे उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीर विनोद ढगे यांनी केले.

 

कॅन्सरचे वाढते प्रमाण चिंताजनक – सत्यनारायण बाबा मोर्य

 

पूर्वी कॅन्सर हा आजार अगदी बोटावर मोजण्या इतक्या लोकांना होता. मात्र आता या कॅन्सरचे प्रमाण झपाट्याने वाढत चालले आहे याला आपली जीवनशैली जबाबदार आहे. पूर्वी आपण सोने,चांदी,पितळाच्या व तांब्याच्या पातेल्यात अन्नपदार्थ शिजवून खायचे मात्र आता अल्युमिनियम व प्लास्टिक मध्ये पदार्थ खाल्ल्याने कॅन्सरचा धोका अधिक प्रमाणात वाढला आहे. त्याचबरोबर पूर्वी आपण लहान असताना जेवणासाठी आईच्या मागे लागायचो. मात्र आता मुलांच्या मागे आई जेवण घेऊन धावते. मात्र तरी त्याला जेवायची इच्छा होत नाही.त्याचे लठ्ठ शरीर व डोळ्यावर चष्मा अशी आताच्या पिढीची परिस्थिती आहे. सकस आहार व व्यायामाचा अभाव असून हे भविष्यासाठी धोक्याची घंटा आहे.असेही बाबा यांनी सांगितले. गंगा नदीच्या प्रदूषण व सर्रासपणे होणारी वृक्षांची कत्तल यामुळे पर्यावरण धोक्यात आले असून, याचे रक्षण करायला हवे. ही सर्वांची जबाबदारी आहे असेही बाबा यांनी सांगितले.

बातमी शेअर करा !
Tags: Bahinabai MahotsavSatyanarayan Baba Moryaकॅन्सर जनजागृतीजळगाव कार्यक्रमपर्यावरण रक्षणबहिणाबाई पुरस्कारबहिणाबाई महोत्सव
Previous Post

बँक ऑफ महाराष्ट्रच्या कलेक्टर ऑफिस शाखेचे आज शुभारंभ!

Next Post

खुर्ची नाकारून कीर्तनासाठी आमदार बसले जमिनीवर !

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
खुर्ची नाकारून कीर्तनासाठी आमदार बसले जमिनीवर !

खुर्ची नाकारून कीर्तनासाठी आमदार बसले जमिनीवर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif