• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

खुर्ची नाकारून कीर्तनासाठी आमदार बसले जमिनीवर !

बहिणाबाई महोत्सवात' नवनिर्वाचित नगरसेवकांचा गौरव; रविकिरण महाराजांची कीर्तनातून समाजप्रबोधनाची 'भरारी' 

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
January 27, 2026
in जळगाव, विशेष बातमी
खुर्ची नाकारून कीर्तनासाठी आमदार बसले जमिनीवर !
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

 

 

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : किर्तन ऐकताना खाली बसून ग्रहण करावे असे ज्ञानी सांगतात. हेच वाक्य खरं करत आमदार राजू मामा भोळे, हे बहिणाबाई महोत्सवात हभप रवीकिरण महाराज यांच्या कीर्तनात आले. त्यांनी महाराजांचे दर्शन घेऊन, चक्क सोपा व खुर्ची नाकारून थेट खाली बसले. त्यांच्या समवेत इतर मंडळी देखील खुर्ची सोडून खाली बसले.

 

कीर्तनाच्या पूर्वसंख्येला नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार प्रसंगी. आमदार राजुमामा भोळे यांनी नगरसेवकांचे अभिनंदन केले.त्यांनी आगामी काळामध्ये आपल्या प्रभागांमध्ये वृक्षारोपणाची मोठी जबाबदारी घेऊन पर्यावरणाला हातभार लावावा. तसेच आठवड्यातून एकदा इंधन बचत करून सायकलीचा वापर करावा असे आवाहन शहराचे लाडके आ. सुरेश भोळे राजूमामा यांनी केले.

 

भरारी बहुउद्देशीय संस्था आणि क्रेडाई, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ११ व्या ‘बहिणाबाई महोत्सवा’च्या सोमवारी झालेल्या सत्रात जळगाव महापालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविकांचा जंगी सत्कार करण्यात आला. याच सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना ‘बहिणाबाई विशेष सन्मान’ देऊन गौरविण्यात आले.

 

या सोहळ्यात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या होनाजी चव्हाण, सागर वाघ, चंद्रकांत सोनवणे, मनोज भंडारकर आणि भिका न्याहाळदे यांना मान्यवरांच्या हस्ते ‘बहिणाबाई विशेष सन्मान’ देऊन गौरविण्यात आले. दरम्यान शहराच्या स्वच्छतेसाठी योगदान देणारे उज्वल बेंडवाल आणि विकी सोनार यांचाही विशेष गौरव करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर आ. सुरेश भोळे (राजूमामा), पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अनिश शहा, रजनीकांत कोठारी, दीपक सूर्यवंशी या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

 

प्रसंगी शहरातील ७५ प्रभागातून निवडून आलेल्या व बिनविरोध झालेल्या नगरसेवकांचा आ. राजूमामा भोळे व महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवकांनी प्रभागांमध्ये विकासाची जबाबदारी खांद्यावर घेऊन समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन करून आ. राजूमामा भोळे यांनी पर्यावरणपूरक आणि स्वच्छ व सुंदर शहर या संकल्पनेवर भर देण्याचे सांगितले.

 

सायंकाळी शेवटच्या सत्रात दोंडाईचा येथील ह.भ.प. रविकिरण महाराज यांचे कीर्तन संपन्न झाले. संत तुकारामांच्या अभंगाचा दाखला देत त्यांनी मानवी स्वभावावर भाष्य केले. “कोणाकडूनही अवास्तव अपेक्षा करू नका, कारण माणसाचा मूळ स्वभाव कधीच बदलत नाही,” असे सांगत त्यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले. त्यांच्या ओघवत्या शैलीतील कीर्तनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले होते.

 

आज, २७ जानेवारी रोजी महोत्सवाचा शेवटचा दिवस आहे. सायंकाळी शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम होतील, तर रात्री ९ वाजता शशिकांत सरवदे व सहकारी ‘लावणी महाराष्ट्राची’ हा बहारदार कार्यक्रम सादर करणार आहेत. जळगावकर रसिकांनी या सांगता सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

बातमी शेअर करा !
Tags: ravikiranmaharaj brekingnews news jalgaonnews
Previous Post

कॅन्सरचे वाढते प्रमाण चिंताजनक ; पर्यावरणाचे रक्षण करा!

Next Post

अजित दादा पवार यांचे विमान अपघातात निधन!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
अजित दादा पवार यांचे विमान अपघातात निधन!

अजित दादा पवार यांचे विमान अपघातात निधन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जंक फूड मुक्त होळीचा विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश!

जंक फूड मुक्त होळीचा विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश!

March 2, 2026
चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

March 2, 2026
खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

March 1, 2026
जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

March 1, 2026
खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

February 28, 2026
स्थायी सभापतीपदी डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण सभापतीपदी सिंधुताई कोल्हे बिनविरोध निवड!

स्थायी सभापतीपदी डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण सभापतीपदी सिंधुताई कोल्हे बिनविरोध निवड!

February 27, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif