• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांना हटवा….

जळगाव प्रथमने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली निवेदनाद्वारे मागणी

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
December 2, 2025
in Uncategorized, जळगाव, विशेष बातमी
आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांना हटवा….
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

 

 

नवराज्य Live डिजिटल न्यूज नेटवर्क

जळगाव –  महानगरपालिकेचे कामकाज ठप्प झाल्याचा आरोप करत जळगाव प्रथम संस्थेने जिल्हाधिकाऱ्यांकडे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांना तात्काळ हटविण्याची मागणी केली आहे. आयुक्त गेल्या काही दिवसांपासून रजेवर असल्याने शहरातील महत्त्वाची कामे ठप्प झाली असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

 

संस्थेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विविध विभागांचे निर्णय प्रलंबित राहिल्याने रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, बांधकाम विभागाची कामे ठप्प झाली आहेत. विभागप्रमुखांना मार्गदर्शन मिळत नसल्याने प्रशासनिक हालचाल पूर्णतः मंदावली आहे. शहरातील दैनंदिन सेवा आणि तातडीच्या कामांवर प्रतिकूल परिणाम होत असून परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे.

 

प्रशासन सुरळीत चालावे यासाठी सक्षम, सक्रिय आणि पूर्णवेळ उपलब्ध राहील अशा अधिकाऱ्याची नियुक्ती करणे आवश्यक असल्याची मागणी संस्थेने केली आहे. आयुक्त ढेरे यांची बदली करून शहराच्या हिताचे निर्णय तातडीने व्हावेत, असे निवेदनात स्पष्टपणे नमूद आहे.

 

निवेदन देताना कैलास कासार, ईश्वर मोरे, ऍड. सागर चित्रे, डॉ. किशोर माळी, माजी महापौर करीम सालार, किरण तळले, भूषण ठाकूर, पंकज राजपूत, मुकुंद सपकाळे, प्रकाश जोशी, नितीन माळी, अविनाश पाटील, राहुल चव्हाण, डॉ. नितीन धांडे, ऍड. डी. एस. भालेराव आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Tags: #Jalgaon #JalgaonNews #Manapa #CommissionerDhere #JalgaonPratham #Nivedan #CityDevelopment #Administration #BreakingNews
Previous Post

लोककला महोत्सवात अनुभूती स्कूलचे कातकरी लोकनृत्य सर्वोत्कृष्ट

Next Post

जलपर्णीपासून बनवल्या उपयोगी साड्या

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जलपर्णीपासून बनवल्या उपयोगी साड्या

जलपर्णीपासून बनवल्या उपयोगी साड्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जंक फूड मुक्त होळीचा विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश!

जंक फूड मुक्त होळीचा विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश!

March 2, 2026
चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

March 2, 2026
खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

March 1, 2026
जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

March 1, 2026
खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

February 28, 2026
स्थायी सभापतीपदी डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण सभापतीपदी सिंधुताई कोल्हे बिनविरोध निवड!

स्थायी सभापतीपदी डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण सभापतीपदी सिंधुताई कोल्हे बिनविरोध निवड!

February 27, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif