कानळदा भोकर देवगाव परिसरातील बिबट्याला जेरबद करा.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे वनविभागाला निवेदन.
जळगाव: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जळगाव तालुक्यातील देवगाव या गावातील शेतकरी इंदुबाई वसंत पाटील या त्यांच्या शेतात काम करत असताना बिबट्याच्या हल्यात ठार झाले आहेत . तातडीने नरभक्षक बिबट्याला जेरबंद करावे व त्यांच्या कुटुंबियांना तातडीने २५ लाखाची आर्थिक मदत देण्यात यावी. अशी मागणी शिवसेना उबाठा च्या पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी जळगांव ग्रामीणचे शिवसेना उप जिल्हाप्रमुख प्रा.भाऊसाहेब सुकदेव सोनवणे यांनी केली आहे.
वनविभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा जेणेकरून पुन्हा कुठलीही जीवितहानी होणार नाही.या परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला असून माणसांना वर हल्ला करत आहे,बिबट्या हा आता नरभक्षक बनला असून त्यावर पिंजरा लावून वनविभागाने जेरबंद करावे जेणेकरून शेतकरी,महिला यांना शेताची कामे भयमुक्त करता येतील अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील,उप जिल्हाप्रमुख प्रा.भाऊसाहेब सोनवणे,अशोक आप्पा सोनवणे,तालुका कार्याध्यक्ष प्रमोद घुगे,भीमराव पांडव,हिरालाल सोनवणे,राजू भाऊ पाटील,विजय लोहार,सचिन चौधरी,नंदलाल सोनवणे ( सरपंच,भोकर ),प्रभाकर कोळी,किरण ठाकूर व पदाधिकारी उपस्थित होते.






