के सी ई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट(स्वायत्त महाविद्यालय ) मध्ये माजी विद्यार्थ्यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा
जळगाव- . महाविद्यालयाची तर गोष्टच काही औरच असते. याचा प्रत्यय अभियांत्रिकी व मॅनेजमेन्ट महाविद्यालयात झालेल्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात आला. जवळपास 20 वर्षांनंतर एकत्र आलेल्या मित्रांनी महाविद्यालयांत असताना केलेल्या गमती-जमती, शिक्षकांनी केलेली शिक्षा, अशा अनेक आठवणींना उजाळा दिला.के सी इ अभियांत्रिकी महाविद्यालयात (स्वायत्त ) २००१ते २००४ मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा माजी विद्यार्थ्यांचा मेळावा झाला. माजी विद्यार्थ्यांनी सरस्वतीची मूर्ती महाविद्यालयाला भेट दिली. विविध क्षेत्रात कार्यरत असलेले विद्यार्थी या वेळी एकत्र आले. धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येक जण आपापल्या कामात गुंतलेला आहे; पण महाविद्यालयाची आठवण कायम येत असल्याचे प्रत्येकाच्या तोंडून निघाले माजी विद्यार्थी मेळाव्यानिमित्त महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी देखील भाग घेतला. त्यामुळे चांगलीच धमाल उडाली. अनेक विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत गीत संगीत सादर केले. त्यामुळे अनेकांना 20 वर्षांपूर्वीचाच अनुभव आला. तर बºयाच माजी विद्यार्थ्यांनी जुन्या काळातील प्रसंग, शिक्षकांची काढलेली खोड याची आठवण यावेळी करून दिली. त्यामुळे आजचा दिवस हा कसा संपला याचे भान विद्यार्थी व शिक्षकांना राहीले नाही. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुगंधी यांनी महाविद्यालयाचे कौशल्य विकासावरचा दृष्टिकोन व महाविद्यालयचा मागील काही वर्षांचा आढावा माजी विद्यार्थाना सांगितला.माजी विदयार्थ्यांनी महाविद्यालयाबद्दल गर्व व्यक्त केला या प्रसंगी रीना कौरानी ,निमिष पिंगळे ,अमोल पराठे ,संदीप मोहिते ,योगेश त्रिपाठी ,मनोज नेहेरे ,या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले .या कार्यक्रमाचे नियोजन प्रा . प्रवीण भंगाळे ,प्रा मनीष महाले,प्रा उमाकांत कोठोके ,प्रा राजश्री शेकोकारे यांनी केले. या कार्यक्रमाला प्रा राहुल पटेल ,प्रा अविनाश सूर्यवंशी प्रा कल्पेश महाजन ,प्रा गणेश पाटील ,प्रा श्रुतिका घरडे ,प्रा किरण पाटील उपस्थित होते .






