नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव – संत ज्ञानेश्वर विद्यालय येथे ‘जंक फूड मुक्त होळी’ हा सामाजिक संदेश देणारा उपक्रम उत्साहात पार पडला. होळीचे पूजन मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.
यानंतर होळीचे दहन इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी जंक फूडला प्रतीकात्मकरीत्या निरोप देत आरोग्यदायी जीवनशैलीचा संकल्प केला.
जंक फूडचे दुष्परिणाम व त्यापासून होणाऱ्या शारीरिक समस्या याबाबत सविस्तर मार्गदर्शन रूपाली आव्हाड मॅडम यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना संतुलित आहार, घरगुती पौष्टिक पदार्थांचे महत्त्व आणि नियमित व्यायाम याबाबत माहिती दिली.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण झाली असून ‘आरोग्यदायी होळी, आनंदी होळी’ हा संदेश सर्वत्र पोहोचविण्यात आला.






