-
- हिरवांकुर फाउंडेशन तर्फे संत ज्ञानेश्वर विद्यालयाला संगणक भेट
- श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाला हिरवांकुर फाउंडेशनचे अध्यक्ष निलय जैन यांच्यातर्फे संगणक संच भेट देण्यात आला.
शाळेमध्ये इको क्लब मार्फत होत असलेली विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण पूरक प्रगती व बदलाचे कौतुक केले. तर, निलय जैन यांनी शिक्षक हा शाळेचा कणा आहे, त्यामुळे त्यांना नेहमी प्रोत्साहन द्यावे, असे मत मांडले. शाळेची प्रगती उत्तरोतर होत राहो, अशा शुभेच्छाही दिल्या.या कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना व शिक्षकांना त्यांच्या मेहनतीचे कौतुक वाटावे आणि अधिक यशाच्या दिशेने प्रेरणा मिळेल. हिरवांकुर फाउंडेशन च्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून त्यांना योग्य मार्गदर्शन, प्रेरणा व भेटवस्तू देऊन एक प्रेरणादायी वातावरण निर्माण केले. असे मुख्याध्यापक मुकेश यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले .मान्यवरांचे आभार उपशिक्षिका शितल कोळी यांनी मानले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी उपस्थित होते.