जळगाव दि. 2- मराठी बालनाट्य दिनाच्या औचितत्यांने शालेय कैसीई सोसायटीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी नवीन शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने, विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या उपजत कलांच्या कौशल्यांना विकसित करण्याच्या अनुषंगाने शालेय विद्यार्थ्यांसाठी, केसीई सोसायटीच्या कान्ह ललित कला केंद्र द्वारे कान्ह कला कट्टा या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचा शुभारंभ उपस्थित विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आला. कान्ह कला कट्टा या उपक्रमात शालेय विद्यार्थ्यांना गायन, वादन, अभिनय तसेच नाट्यतंत्र, लोकनृत्य, चित्रकला व शिल्पकला या कलांचे नवीन शैक्षणिक धोरणाच्या आधारे कौशल्य वृद्धिगत करून, भविष्यातील शैक्षणिक आव्हानांना सूर्जनात्मकरित्या कसे सामोरे जावे. याचे कलेच्या माध्यमातून शास्त्रशुद्ध शिक्षण या उपक्रमात करण्यात येणार आहे. यासाठी केसीई सोसायटीचे मा. अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे व व्यवस्थापन मंडळ, यांच्या संकल्पनेतुन

बालनाट्य दिनाचे औचित्य साधून केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प. वि.पाटील विद्यालय , ए. टी. झांबरे विद्यालय , ओरियन स्टेट बोर्ड तसेच सी.बी. एस. ई. ,किलबिल बालक मंदिर या शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी कान्ह कला कट्ट्याचे उद्घाटन करण्यात आले.

सदर कला कट्ट्याचे उद्घाटन प्रतिनिधिक स्वरूपात सहभागी विद्यार्थ्यांच्या शुभहस्ते फीत सोडून करण्यात आले, यावेळी केसीई सोसायटीचे सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर, कान्ह ललित कला केंद्र समन्वयक प्रसाद देसाई ,ए. टी. झांबरे विद्यालयाच्या मुख्या.प्रणिता झांबरे, ओजस्विनी कला महाविद्यालयाचे प्राचार्य मिलन भामरे व सहकारी उपस्थितीत होते.

या कट्ट्यामध्ये विद्यार्थ्यांना नृत्य ,नाट्य , अभिनय , चित्रकला , शिल्पकला , वादन ,गायन इत्यादी कलांचे मार्गदर्शन विशेष प्रशिक्षणाच्या मार्फत दिले जाणार आहे. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांच्या कला सहजतेने वृद्धिंगत होण्यास मदत होणार आहे.

यासाठी प्रशिक्षक म्हणून नृत्य अजय शिंदे ,गायन मयुरी हरिमकर, तालवादन देवेंद्र गुरव, बासरी प्रसाद कासार,अभिनय व नाट्य तंत्र वैभव मावळे, हेमंत पाटील, दिनेश माळी तर चित्रकला पुरुषोत्तम घाटोळ, पियुष बडगुजर, शिल्पकला दिगंबर शिरसाळे

यांचे अनुभवी तज्ञ मार्गदर्शन लाभणार आहे.कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उपशिक्षक योगेश भालेराव , चंद्रकांत कोळी आदी शिक्षक उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here