• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

स्थायी सभापतीपदी डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण सभापतीपदी सिंधुताई कोल्हे बिनविरोध निवड!

सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळाला – डॉ. चंद्रशेखर पाटील, सर्वांना सोबत घेऊन काम करणार – सिंधुताई कोल्हे

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
February 27, 2026
in जळगाव, निवडणूक
स्थायी सभापतीपदी डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण सभापतीपदी सिंधुताई कोल्हे बिनविरोध निवड!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : महानगरपालिकेच्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या समित्यांच्या निवडीत आज महत्त्वाचा निर्णय झाला. शहरातील विकासकामे, विविध योजना तसेच निधीच्या तरतुदींसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या स्थायी समितीच्या सभापतीपदी डॉ. चंद्रशेखर पाटील, तर महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी सिंधुताई कोल्हे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

या निवड प्रक्रियेत पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी काम पाहिले. यावेळी महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, नगरसचिव सतीश शुक्ला यांच्यासह सभागृहातील सदस्य उपस्थित होते.

स्थायी सभापतीपदासाठी सूचक नितीन लढ्ढा व अनुमोदक विशाल भोळे, तर महिला व बालकल्याण सभापतीपदासाठी सूचक प्रतिभा देशमुख व अनुमोदक डॉ. अमृता सोनवणे होते.

बिनविरोध निवड झाल्यानंतर सभागृहात सदस्यांनी टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले. तर सभागृहाबाहेर ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत नवनिर्वाचित सभापतींचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

निवडीनंतर प्रतिक्रिया देताना डॉ. चंद्रशेखर पाटील म्हणाले, “सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळाला असून नागरिकांच्या अपेक्षांनुसार विकासकामांना प्राधान्य देणार आहे.”

तर सिंधुताई कोल्हे यांनी, “महिला, बालकल्याण व सामाजिक प्रश्नांवर सर्वांना सोबत घेऊन प्रभावी काम केले जाईल,” असे सांगितले.

बातमी शेअर करा !
Tags: आयुक्त ज्ञानेश्वर ढेरेजळगावडॉक्टर चंद्रशेखर पाटीलबिनविरोध निवडमहानगरपालिकामीनल करणवालसिंधुताई कोल्हेसीईओ जिल्हा परिषदस्थायी समिती
Previous Post

उद्यापासून ५ वा,आंतरराष्ट्रीय देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल!

Next Post

खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

खान्देश महोत्सवात आज "होम मिनिस्टर"व रंगणार पैठणीचा खेळ!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

September 5, 2026
युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif