संत ज्ञानेश्वर विद्यालयात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाचे धडे
श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय व मनपा यांच्या संयुक्त विद्यमानाने संत ज्ञानेश्वर विद्यालयच्या प्रांगणात आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न झाली. आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण अश्वजीत घरडे व त्यांचे सहकारी देविदास सुरवाडे यांनी दैनंदिन जीवनात निर्माण होणाऱ्या विविध आपत्ती व आपत्तींचे प्रकार यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. या आपत्तीपैकी अग्नि व्यवस्थापन कशा प्रकारे करावे हे सांगताना त्यांनी अग्नीची कारणे, अग्नीचे परिणाम व आग विझविण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजना यावर सविस्तर माहिती दिली. आगीचे व्यवस्थापन करताना प्रत्यक्ष आग लागल्यानंतर अग्निशामक उपकरणाद्वारे कशी नियंत्रणात आणता येईल याचे प्रात्यिक्षक विद्यार्थ्यांना दाखिवले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका शितल कोळी यांनी केले. या प्रात्यक्षिक प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक शाळेतील सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.