श्री समर्थ विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

जळगाव आव्हाने शिवार –श्री समर्थ विद्यालय व श्री मनोज पाटील इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल आव्हाने शिवार येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.संस्थेचे अध्यक्ष  मनोज पाटील सर ,संचालक  रामराजे पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापिका  हर्षाली पाटील, मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली शिंदे व मुख्याध्यापिका  मंजुषा सोनवणे उपस्थित होत्या.

कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, कविता व भाषणे सादर करून लोकमान्य टिळकांचे कार्य आणि अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य व लोककलेतील योगदान अधोरेखित केले. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले व सामाजिक बांधिलकी व देशभक्तीचे संस्कार जोपासण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here