नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव : नवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त श्री समर्थ प्राथमिक विद्यामंदिर, आव्हाणे शिवार, कानळदा रोड, जळगाव येथे इनरव्हील स्पार्कल क्लब, जळगाव यांच्या वतीने शुक्रवार, दिनांक १६ ऑक्टोबर २०२६ रोजी कन्या पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात तीन ते पाच वर्षे वयोगटातील सुमारे ६० ते ६५ बालिकांचे विधिवत पूजन करण्यात आले. तसेच त्यांना प्रेमपूर्वक भोजन देऊन भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून बालिकांप्रती आदर, प्रेम आणि सेवाभाव व्यक्त करण्यात आला.
इनरव्हील स्पार्कल क्लबच्या अध्यक्षा श्रीमती माधवी असावा, सचिव श्रीमती तरुणा अग्रवाल,आशा गदिया, सुनीता पाटील सीमा जाकेटे, छाया पाटील तसेच क्लबच्या सर्व सदस्यांनी व शाळेच्या मुख्याधपिका हर्षाली पाटील, मंजुषा सोनवणे यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. सर्वांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम आनंदी व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

या स्तुत्य सामाजिक व धार्मिक उपक्रमाबद्दल श्री समर्थ प्राथमिक विद्यामंदिराच्या वतीने क्लबच्या अध्यक्षा, सचिव व सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
बालिकांचा सन्मान आणि त्यांच्याप्रती प्रेम व्यक्त करणारा हा उपक्रम उपस्थितांसाठी आनंददायी व प्रेरणादायी ठरला.







