• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

नशामुक्त जळगाव अभियानासाठी जैन उद्योग समूह सदैव सोबत – अशोक जैन.

माझं स्वप्न ‘नशामुक्त जळगाव’ अभियान उत्साहात

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
October 18, 2026
in जळगाव, सामाजिक
नशामुक्त जळगाव अभियानासाठी जैन उद्योग समूह सदैव सोबत – अशोक जैन.
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क 

जळगाव: ‘व्यसनमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी जनजागृती आणि सामूहिक प्रयत्नांची गरज असून, जळगाव जिल्हा पोलिस दलाच्या सहकार्याने वैशाली फाउंडेशनतर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘माझं स्वप्न नशामुक्त जळगाव’ अभियानाला जैन उद्योग समूहाचे सहकार्य राहील’, असे आश्वासन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी दिले. या अभियानांतर्गत राबविण्यात येणारे उपक्रम, प्रकल्प आणि जनजागृतीच्या विविध संकल्पनांना सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. जळगाव जिल्हा पोलिस दलाच्या सहकार्याने वैशाली फाउंडेशनतर्फे आयोजित नशामुक्त जळगाव अभियानाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

 

छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमाला वैशाली फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा नगरसेविका वैशाली पाटील यांनी प्रास्ताविकेत या उपक्रमाबाबत माहिती सांगितली. राज्याचे मंत्री नामदार गिरीश महाजन, पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील, आ. मंगेश चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास आदिवासी विकासमंत्री अशोक उईके, महापौर दीपमाला काळे, आ. राजूमामा भोळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापालिका आयुक्त आदित्य जीवने, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

 

स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी राहुल गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना समजेल अशा सोप्या आणि प्रभावी पद्धतीने सादरीकरणाद्वारे नशेचे दुष्परिणाम आणि त्याविषयीची जनजागृती याबाबत माहिती दिली. या कार्यक्रमाला विविध शाळांमधील मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Tags: अशोक जैनजळगाव बातम्याजैन उद्योग समूहनशामुक्त जळगाववैशाली फाउंडेशनव्यसनमुक्ती अभियान
Previous Post

श्री समर्थ प्राथमिक विद्यामंदिरात कन्या पूजन कार्यक्रम उत्साहात संपन्न

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नशामुक्त जळगाव अभियानासाठी जैन उद्योग समूह सदैव सोबत – अशोक जैन.

नशामुक्त जळगाव अभियानासाठी जैन उद्योग समूह सदैव सोबत – अशोक जैन.

October 18, 2026
श्री समर्थ प्राथमिक विद्यामंदिरात कन्या पूजन कार्यक्रम उत्साहात संपन्न

श्री समर्थ प्राथमिक विद्यामंदिरात कन्या पूजन कार्यक्रम उत्साहात संपन्न

October 16, 2026
जामनेर-बोदवड रस्त्यावर काळाचा घाला ; एकाच दुचाकीवरील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू!

जामनेर-बोदवड रस्त्यावर काळाचा घाला ; एकाच दुचाकीवरील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू!

October 15, 2026
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड!

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड!

October 15, 2026
रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी ; श्री समर्थ विद्यालयात वाहतुकीच्या नियमांवर दिले विद्यार्थ्यांना धडे!

रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी ; श्री समर्थ विद्यालयात वाहतुकीच्या नियमांवर दिले विद्यार्थ्यांना धडे!

October 14, 2026
बायपास बंदमुळे सात जणांचा बळी; नुकसानभरपाईची जबाबदारी कोणाची?

बायपास बंदमुळे सात जणांचा बळी; नुकसानभरपाईची जबाबदारी कोणाची?

October 13, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif