नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात वाढत्या वाहन चोरीच्या घटनांना आळा घालजळगाव : जिल्ह्यात वाढत्या वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी कठोर कारवाईचे आदेश दिल्यानंतर मुक्ताईनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत ३० चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या प्रकरणी दोन आरोपींसह दोन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून जप्त वाहनांची अंदाजे किंमत २५ लाख ८० हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.ण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी कठोर कारवाईचे आदेश दिल्यानंतर मुक्ताईनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत ३० चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या प्रकरणी दोन आरोपींसह दोन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून जप्त वाहनांची अंदाजे किंमत २५ लाख ८० हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथे दिनांक २६ जून २०२६ रोजी दाखल गुन्हा क्रमांक २७३/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अंतर्गत तपास सुरू असताना तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी विशाल सुरेश सोनवणे (रा. पिंपरुड ता. यावल), कुंदन सुनिल महाले (रा. सालबर्डी ता. मुक्ताईनगर) यांच्यासह दोन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान आरोपींनी केवळ संबंधित गुन्हाच नव्हे तर आणखी २९ मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. चोरी केलेल्या गाड्या रेल्वे स्टेशन आणि बसस्थानकांच्या पे अँड पार्किंगमध्ये उभ्या करून त्याच ठिकाणी ग्राहकांना विक्री करण्याची आरोपींची कार्यपद्धती असल्याचे तपासात उघड झाले.
जप्त करण्यात आलेल्या मोटारसायकली महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये नोंदणीकृत असल्याचे समोर आले आहे. या वाहन चोरीप्रकरणी गुजरातमधील उधना (सुरत) तसेच ठाणे, नवी मुंबई, नाशिक, रायगड आणि जळगाव जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांच्या पथकाने केली.





