नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव : सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या बळावरच पक्ष उभा आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी पक्षाची उभारणी करताना तळागाळातील सामान्य कार्यकर्त्याला सोबत घेऊन संघटना मजबूत केली, असे प्रतिपादन राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी केले. त्या भाजपा जळगाव जिल्हा महानगरतर्फे दि. 27 व 28 मे रोजी आयोजित दोन दिवसीय ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय महाप्रशिक्षण शिबिरा’त बोलत होत्या. हे निवासी शिबिर जामनेर तालुक्यातील गारखेडा येथील बॅकवूड रिसॉर्ट येथे पार पडले.

या शिबिराचे उद्घाटन दि. 27 मे रोजी सकाळी 10 वाजता झाले. यावेळी आमदार श्रीकांत भारती, प्रदीप पेशकार, आमदार सुरेश भोळे, प्रदेश सरचिटणीस भैरवी वाघ, जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, लक्ष्मण सावजी, महापौर दीपमाला काळे, चंद्रकांत बाविस्कर, रवी अनासपुरे तसेच पदाधिकारी उपस्थित होते.
शिबिरामध्ये एकूण 11 सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. दि. 27 मे रोजी श्रीकांत भारती, लक्ष्मणराव सावजी, प्रदीप पेशकार, रवी अनासपुरे आणि चंद्रकांत बाविस्कर यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
दि. 28 मे रोजी सकाळी 10.30 वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी आमदार सुरेश भोळे, प्रविण आलई, दीपक सूर्यवंशी, महापौर दीपमाला काळे, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, गटनेते प्रकाश बालाणी, माजी अध्यक्षा उज्वला बेडाळे तसेच माजी महापौर सीमाताई भोळे उपस्थित होते.
यानंतरच्या सत्रांमध्ये प्रविण आलई, माजी आमदार संजय केणेकर आणि आमदार संजय कुटे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी खासदार मेधा कुलकर्णी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले.
त्या म्हणाल्या की, भाजप पक्षाच्या वाढीसाठी पडत्या काळात ज्यांनी पक्षासाठी मेहनत घेतली आणि समर्पणाने काम केले, त्या कार्यकर्त्यांमुळेच आज पक्ष केंद्र आणि राज्यात सत्तेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्षे पूर्ण झाली असून ‘सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास’ या विचारातून सरकार काम करत आहे. भाजप हा विचारधारेवर चालणारा पक्ष असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
दोन दिवसीय निवासी शिबिरासाठी भाजपा जिल्हा महानगर पदाधिकारी, जिल्हा आघाडी अध्यक्ष आणि नगरसेवक असे एकूण 155 कार्यकर्ते उपस्थित होते. प्रशिक्षण शिबिराचे प्रमुख दीपक परदेशी होते.
या महाप्रशिक्षण शिबिरासाठी भाजपा जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, राहुल वाघ, नितीन इंगळे, जयेश भावसार, मिलिंद चौधरी, प्रकाश पंडित, उदयजी भालेराव, मनोज भांडारकर, मयूर भदाणे, संजय नारखेडे, अशोक राठी, अजित राणे, विनोद मराठे, अतुल बारी, जितेंद्र चव्हाण, आनंद सपकाळे, अमित देशपांडे, रोहित सोनवणे, चेतन तिवारी आणि हर्षल सेतवाल यांनी अथक परिश्रम घेतले.







