• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

जळगाव महापालिकेचे सभागृह नेते नामधारीच!

महासभेत आक्रमक नगरसेवकांचा दबदबा; नवोदित सदस्य मात्र शांतच.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
May 20, 2026
in जळगाव, महापालिका, राजकारण
जळगाव महापालिकेचे सभागृह नेते नामधारीच!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

योगेश सुने -चीफ एडिटर

जळगाव शहर महानगरपालिकेची तिसरी महासभा दिनांक १४ मे रोजी पार पडली. विशेष म्हणजे, पूर्वी ज्या सदस्यांनी महासभा गाजवल्या आणि सभागृहात आक्रमक भूमिका घेतली, तीच मंडळी आजही सभागृहात प्रभावीपणे दिसून येत आहेत. मात्र, महासभेतील चर्चांचा दर्जा आणि विषयांवरील मांडणी पाहता अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

महासभेत विषय पत्रिकेतील मुद्द्यांवर सखोल चर्चा होण्याऐवजी, पक्षाच्या बैठकीत विषयांची पुरेशी माहिती न घेता इतरच मुद्द्यांवर चर्चा रंगताना दिसते. अनेकदा मूळ विषय बाजूला पडून असंबंधित विषयांवर चर्चा होत असल्याने सभागृहातील कामकाज भरकटत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

यामुळे गटनेते आणि सभागृह नेत्यांचे सदस्यांवर नियंत्रण आहे का? त्यांच्या सूचनांचे पालन केले जाते का? असे प्रश्न आता उघडपणे विचारले जात आहेत. भाजपाने पूर्वी अभ्यासू, प्रभावी आणि राजकीय डावपेचांमध्ये पारंगत असलेल्या नेत्यांना पक्षात स्थान देत केवळ नाममात्र पदे बहाल केली आहेत काय? अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

दरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे अरविंद देशमुख हे प्रत्येक महासभेत मूळ विषय पत्रिकेऐवजी इतर विषयांवर सभागृहाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येते. अधिनियमातील कलम १४४ अंतर्गत सभेपूर्वी प्रश्नावली न देता विविध मुद्द्यांवर चर्चा छेडण्याची त्यांची शैली वारंवार चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळे गटनेत्यांना डावलले जात असल्याची भावना सभागृहात निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे.

महासभेतील चर्चांमध्ये पूर्वाश्रमीचे नगरसेवकच जनतेच्या प्रश्नांवर आक्रमकपणे भूमिका मांडताना दिसत आहेत. यातील अनेक नगरसेवक हे पूर्वी शहर विकास आघाडी किंवा खानदेश विकास आघाडीशी संबंधित होते. त्यामुळे सध्या भाजपा, शिवसेना तसेच इतर आघाड्या शहरातील जनतेवर आपले नेतृत्व व पकड असल्याचा केवळ भास निर्माण करत आहेत का? अशीही चर्चा सुरू झाली आहे.

राजकीय इतिहास पाहिला तर, मागील पंचवार्षिकमध्ये भाजपाची स्पष्ट सत्ता असतानाही पक्षातील नाराज नगरसेवकांनी स्वतंत्र गट स्थापन करून शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेचा प्रयोग यशस्वी केला होता. त्यांनी स्वतःचा महापौर निवडून संपूर्ण कार्यकाळ पूर्ण केला होता. त्यामुळे सध्याच्या सभागृहातील वातावरण पाहता, भविष्यात अशाच राजकीय घडामोडी पुन्हा घडू शकत नाहीत, असे ठामपणे म्हणता येत नसल्याची चर्चा राजकीय पटलावर रंगू लागली आहे.

मात्र, या सर्व घडामोडींमध्ये नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांना सभागृहात बोलण्याची संधी मिळत नाही का? किंवा त्यांना जाणीवपूर्वक बोलू दिले जात नाही का? असेही प्रश्न उपस्थित होत आहेत. ज्या नागरिकांनी त्यांना निवडून दिले, त्यांच्या मनात याबाबत नेमकी काय भावना निर्माण होत असेल, याचीही चर्चा सुरू आहे. जर हीच परिस्थिती कायम राहिली, तर संबंधित नगरसेवकांना भविष्यात त्यांच्या कार्यप्रणालीबाबत जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागू शकते, यात शंका नाही.

बातमी शेअर करा !
Tags: अरविंद देशमुखजळगाव महानगरपालिकाजळगाव राजकारणभाजपामहासभाशिवसेना
Previous Post

जळगावात डासांवर आक्रमक मोहीम; उपमहापौर मनोज चौधरी यांचे मलेरिया विभागाला तातडीचे निर्देश

Next Post

दीड लाखांची लाच घेताना उपनिबंधकासह दोघे एसीबीच्या जाळ्यात!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
दीड लाखांची लाच घेताना उपनिबंधकासह दोघे एसीबीच्या जाळ्यात!

दीड लाखांची लाच घेताना उपनिबंधकासह दोघे एसीबीच्या जाळ्यात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif