• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

दीड लाखांची लाच घेताना उपनिबंधकासह दोघे एसीबीच्या जाळ्यात!

अवैध सावकारी प्रकरणात अनुकूल अहवाल देण्यासाठी ३ लाखांची मागणी; पहिला हप्ता स्वीकारताना खासगी इसमासह कारवाई

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
May 20, 2026
in जळगाव
दीड लाखांची लाच घेताना उपनिबंधकासह दोघे एसीबीच्या जाळ्यात!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव उपनिबंधक सह संस्था, जळगाव येथील उपनिबंधक जगदीश बाबुराव बारी (वर्ग-१) यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत १ लाख ५० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात खासगी इसम देविदास धनसिंग पाटील याला लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले

 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराविरुद्ध अवैध सावकारी प्रकरणी चौकशी सुरू होती. या प्रकरणात तक्रारदार व त्यांच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल होऊ नये तसेच चौकशी अहवाल अनुकूल पाठविण्यासाठी उपनिबंधक जगदीश बारी यांनी सुरुवातीला ५ लाख रुपयांची लाच मागितली होती.तडजोडीनंतर ही रक्कम ३ लाख रुपयांवर निश्चित करण्यात आली.तक्रारदारांनी याबाबत १८ मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे तक्रार दिल्यानंतर पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. या पडताळणीत जगदीश बारी यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

 

तसेच “मागील प्रकरणात तुम्ही वकील लावला म्हणून आमचे नुकसान झाले होते, त्यामुळे नकारात्मक अहवाल दिला होता. मात्र आता अनुकूल अहवाल पाठवितो,” असे सांगत त्यांनी लाचेची मागणी कायम ठेवली.यानंतर लाचेच्या रकमेपैकी पहिला हप्ता म्हणून १ लाख ५० हजार रुपये आरोपी देविदास धनसिंग पाटील यांच्याकडे देण्यास सांगण्यात आले. त्यानुसार बुधवारी सापळा रचण्यात आला. जळगाव जिल्हा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स असोसिएशन लिमिटेड, बी.जे. मार्केट, जळगाव येथे देविदास पाटील यांनी तक्रारदाराकडून १ लाख ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले.

 

या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे यांनी केली. पथकात पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, बाळू मराठे, संगीता पवार, मनोज पाटील व सचिन चाटे यांचा समावेश होता. तपास स्मिता नवघरे करीत आहेत.

बातमी शेअर करा !
Tags: उपनिबंधकएसीबीजळगावपोलिस कारवाईभ्रष्टाचारलाचखोरी
Previous Post

जळगाव महापालिकेचे सभागृह नेते नामधारीच!

Next Post

‘नो व्हेईकल डे’ निमित्त महापौर दीपमाला काळे सायकलवरून कार्यालयात!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
‘नो व्हेईकल डे’ निमित्त महापौर दीपमाला काळे सायकलवरून कार्यालयात!

'नो व्हेईकल डे' निमित्त महापौर दीपमाला काळे सायकलवरून कार्यालयात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif