• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जिल्हा

अपात्र नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांच्या याचिकेवर आज खंडपीठात सुनावणी

जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर न्यायालयात धाव; निकालावर भुसावळच्या राजकारणाचे भवितव्य ठरणार

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
May 5, 2026
in जिल्हा, ब्रेकिंग, राजकारण
अपात्र नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांच्या याचिकेवर आज खंडपीठात सुनावणी
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क 

भुसावळ : भुसावळ नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदावरून अपात्र ठरवण्यात आलेल्या गायत्री भंगाळे यांनी शासनाच्या निर्णयाला आव्हान दिले असून, त्यांच्या याचिकेवर आज खंडपीठात सुनावणी होणार आहे. या प्रकरणाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून विजयी झालेल्या भंगाळे यांना अवघ्या चार महिन्यांतच अपात्रतेचा सामना करावा लागला. त्यांच्या जात प्रमाणपत्राबाबत तक्रारी दाखल झाल्यानंतर जिल्हा जात पडताळणी समितीने २३ एप्रिल रोजी त्यांचे प्रमाणपत्र रद्द केले होते.

या निर्णयानंतर राज्याच्या नगरविकास विभागानेही तत्काळ कार्यवाही करत भंगाळे यांचे नगराध्यक्षपद रद्द करण्याचा आदेश दिला. यामुळे शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या निर्णयाविरोधात भंगाळे यांनी न्यायालयात धाव घेतली असून, खंडपीठात याचिका दाखल केली आहे. आज होणाऱ्या सुनावणीत न्यायालय कोणता निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी काळात या निकालाचा स्थानिक राजकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, न्यायालयाचा निकाल भंगाळे यांच्या बाजूने न लागल्यास भुसावळ नगरपालिकेत पोटनिवडणुकीची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.

बातमी शेअर करा !
Tags: अपात्रखंडपीठजात पडताळणी समितीनगरपालिकानगराध्यक्षन्यायला धावभुसावळशासन आदेशसुनवणी
Previous Post

जळगावात विजेचा ताण कमी करण्यासाठी महापौरांचा पुढाकार!

Next Post

पांढरा काविळ असलेल्या दोन रुग्णांवर शिबिरातून मोफत मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
पांढरा काविळ असलेल्या दोन रुग्णांवर शिबिरातून मोफत मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया

पांढरा काविळ असलेल्या दोन रुग्णांवर शिबिरातून मोफत मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif