• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home आरोग्य

पांढरा काविळ असलेल्या दोन रुग्णांवर शिबिरातून मोफत मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील नेत्रतज्ज्ञांनी स्विकारले आव्हान

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
May 5, 2026
in आरोग्य, जळगाव
पांढरा काविळ असलेल्या दोन रुग्णांवर शिबिरातून मोफत मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : पांढरा कावीळ (हिपॅटायटीस बी) या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या दोन वयोवृद्ध रुग्णांवर शिबिरातून मोफत मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया करून डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. इतर ठिकाणी उपचाराबाबत निराशा मिळालेल्या या रुग्णांना येथे नवजीवन मिळाले आहे.

याबाबत माहिती अशी की, दोन्ही रुग्णांना पांढर्‍या कावीळमुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमी झाली होती. त्याचबरोबर डोळ्यांत मोतीबिंदू आल्यामुळे त्यांची दृष्टी धुसर झाली होती. अशा स्थितीत शस्त्रक्रिया करणे हे अत्यंत जोखमीचे मानले जाते. त्यामुळे अनेक ठिकाणी डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला होता.मात्र डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील अनुभवी नेत्रतज्ज्ञ डॉ. नितु पाटील यांनी शिबिरात रुग्णांची सखोल तपासणी करून त्यांची वैद्यकीय स्थिती काळजीपूर्वक अभ्यासली. आवश्यक ती पूर्वतयारी, विशेष खबरदारी आणि योग्य नियोजन करून शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.

तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत दोन्ही रुग्णांवर यशस्वीरीत्या मोतीबिंदूची शस्त्रक्रिया पार पाडली.शस्त्रक्रियेनंतर दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या दृष्टीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. उपचारानंतर रुग्णांनी समाधान व्यक्त करत डॉक्टरांचे आभार मानले डॉ उर्मी गायकवाड,डॉ. गौरव पाटील,डॉ प्रिया गोरे, डॉ अभिजित,सभा प्रतिक्षा सिस्टर

पांढर्‍या कावीळ असलेल्या रुग्णांवर कोणतीही शस्त्रक्रिया करणे हे आव्हानात्मक असते. मात्र योग्य तपासणी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि अत्याधुनिक सुविधा यांच्या मदतीने अशा गुंतागुंतीच्या परिस्थितीतही यश मिळवता येते. रुग्णांना योग्य वेळी उपचार मिळणे महत्त्वाचे आहे, असे मत संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले.

– नितु पाटील, डॅ. उल्हास पाटील रूग्णालय.

बातमी शेअर करा !
Tags: जळगाव हेल्थ न्यूजडॉ उल्हास पाटील हॉस्पिटलपांढरा कावीळमोतीबिंदू ऑपरेशनमोफत आरोग्य सेवा
Previous Post

अपात्र नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांच्या याचिकेवर आज खंडपीठात सुनावणी

Next Post

​महात्मा फुले मार्केटमधील अतिक्रमणांवर महापौरांचा संताप!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
​महात्मा फुले मार्केटमधील अतिक्रमणांवर महापौरांचा संताप!

​महात्मा फुले मार्केटमधील अतिक्रमणांवर महापौरांचा संताप!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026

डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif