• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

जळगावात महाराष्ट्र दिन उत्साहात; जनगणनेत सहभागाचे आवाहन

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा संदेश • डिजिटल ‘स्वयं गणना’ला सुरुवात • विकासकामांचा आढावा

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
May 2, 2026
in जळगाव, महाराष्ट्र
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जनगणना ही देशाच्या विकासाचा पाया असून नागरिकांनी अचूक माहिती देत या राष्ट्रीय कार्यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त पोलिस कवायत मैदानावर आयोजित शासकीय कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी महापौर दीपमाला काळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासह विविध अधिकारी व नागरिक उपस्थित होते. पाटील यांनी सांगितले की, यंदाची जनगणना पूर्णतः डिजिटल पद्धतीने होणार असून १ मे ते १५ मे दरम्यान “स्वयं गणना” सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

आरोग्य क्षेत्रात जिल्ह्याने प्रगती साधत अनेक आरोग्य केंद्रांना राज्यस्तरीय मानांकन मिळाले असून आयुष्यमान भारत योजनेतून लाखो नागरिकांना लाभ मिळाल्याचे त्यांनी सांगितले. रोजगार निर्मिती योजनेत नवीन उद्योगांना मंजुरी मिळून रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत, तर नैसर्गिक आपत्तीत बाधित शेतकऱ्यांना कोट्यवधींची मदत वितरित करण्यात आली आहे.

कामगार कल्याण योजनांमधून हजारो कामगारांना विविध लाभ देण्यात आले असल्याचेही त्यांनी नमूद केले. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दुपारी बाहेर पडणे टाळून आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमात पालकमंत्र्यांनी परेडची मानवंदना स्वीकारली व विविध विभागातील उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

बातमी शेअर करा !
Tags: गुलाबराव पाटीलजनगणना 2026जळगावडिजिटल जनगणनामहाराष्ट्र दिनस्वयं गणना
Previous Post

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल

Next Post

का.उ. कोल्हे विदयालयाचे इ.१२वीच्या परीक्षेत यश “

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
का.उ. कोल्हे विदयालयाचे इ.१२वीच्या परीक्षेत यश “

का.उ. कोल्हे विदयालयाचे इ.१२वीच्या परीक्षेत यश "

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif