• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

वाढत्या तापमानामुळे शहरातील चौकांमध्ये ‘वॉटर शॉवर’

रस्त्यावर थंडावा राहण्यासाठी महापौरांच्या आदेशानंतर कार्यवाही; नागरिकांना दिलासा

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
April 25, 2026
in जळगाव, हवामान
वाढत्या तापमानामुळे शहरातील चौकांमध्ये ‘वॉटर शॉवर’
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव: शहरात सध्या उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणावर वाढला असून तापमानाचा पारा ४२ अंशांच्या पुढे गेला आहे. या वाढत्या उष्णतेपासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळावा आणि शहरात थंडावा निर्माण व्हावा, यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेतर्फे शनिवारी (२५ एप्रिल) दुपारी शहरातील प्रमुख चौकांमध्ये टँकरद्वारे पाणी मारण्यात आले. महापौर दीपमाला काळे यांच्या निर्देशानुसार आणि शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत महानगरपालिकेने ही मोहीम राबवली.

दुपारच्या कडक उन्हात रस्ते तापल्याने निर्माण होणारी उष्णता कमी करण्यासाठी दोन टँकरच्या मदतीने महत्त्वाच्या ठिकाणी पाणी मारण्यात आले. हे २ टँकर महापौर दीपमाला काळे यांनी त्यांच्यावतीने उपलब्ध करून दिले होते. यात चित्रा चौक, कोर्ट चौक, नवीन बस स्टँड परिसर, आकाशवाणी चौक, काव्यरत्नावली चौक, नेहरू चौक, टॉवर चौक या कार्यवाहीमुळे परिसरात काही अंशी थंडावा निर्माण झाला असून, रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना व नागरिकांना उष्णतेच्या लाटेपासून तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

ही मोहीम यशस्वी करण्यासाठी शहर अभियंता योगेश बोरोले, पर्यावरण विभागाचे अधिकारी प्रकाश पाटील यांच्यासह महापालिकेचे इतर अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष रस्त्यावर उपस्थित होते. आगामी दिवसांत उष्णतेची तीव्रता पाहता अशाच प्रकारे उपाययोजना राबवण्याबाबत महापालिका प्रशासन विचार करत आहे.

बातमी शेअर करा !
Tags: उन्हाळाउष्णतेची लाटजळगावतापमान वाढमहापालिकावॉटर शॉवर
Previous Post

कापूस शेतीतील महिलांच्या आरोग्य व पोषणासाठी जळगाव जिल्ह्यात ‘वात्सल्य प्लस’ उपक्रम कार्यान्वित

Next Post

JCL T-20अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी”

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
JCL T-20अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी”

JCL T-20अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif