• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्रिकेट स्पर्धा

JCL T-20अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी”

जिंकणार कोण? शहराचा श्वास रोखणारा थरार आज शिगेला…

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
April 26, 2026
in क्रिकेट स्पर्धा, जळगाव
JCL T-20अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी”
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्यLive न्यूज नेटवर्क

जळगाव दि.२६ प्रतिनिधी : जळगाव क्रिकेट लीग २०२६ चा बहुप्रतिक्षित ग्रॅण्ड फायनल सामना आज रविवारी संध्याकाळी ६ वाजता जैन ड्रीम स्पेसेस च्या मैदानावर रंगणार आहे. अमळनेर सुहांस जायंटस व जळगाव कोगटा किंग्ज या दोन दमदार संघांमध्ये विजेतेपदासाठी टक्कर पाहायला मिळणार आहे. संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम फेरीत पोहोचलेल्या दोन्ही संघांनी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. आता हा थरारक सामना कोण जिंकणार व विजेतेपदाची ट्रॉफी कोण उंचावणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

क्वालिफायर च्या दुसऱ्या सामन्याची नाणेफेक छत्रपती शिवाजी पुरस्कार विजेत्या आयशा खान यांच्या उपस्थितीत झाले. जामनेर सातपुडा हिरोज चे कर्णधार शतायु कुलकर्णी यांने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रद्युम्न महाजनची संयमी खेळी आणि राम राठोडची फटकेबाजी यामुळे जामनेर सातपुडा हिरोजच्या डावाला आकार दिला. जामनेर सातपुडा हिरोज संघाने निर्धारित २० षटकांत १६० धावांचा टप्पा ओलांडत प्रतिस्पर्धी संघासमोर सन्मानजनक आव्हान उभे केले होते.

सलामीवीर मानस विजय पाटील १० धावांवर बाद झाल्यानंतर, राम राठोडने आक्रमक पवित्रा घेत २८ चेंडूत ४३ धावा काढल्यात. यात त्याने ४ चौकार, ३ उत्तुंग षटकार खेचले. मात्र, एका बाजूने विकेट्स पडताना प्रद्युम्न महाजनने खिंड लढवली. त्याने ४३ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद ६१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. क्रिषी नथानीने ३३ धावांचे योगदान देत त्याला उत्तम साथ दिली. जामनेरचा डाव ५ बाद १६० धावांवर स्थिरावला.

इम्पॅक्ट प्लेयर सागर भावसार याने ४ षटकांमध्ये ३१ धावा देत २ गडी बाद केले. तर मनिष चौहाण याने ४ षटकांत फक्त २५ धावा देत २ गडी बाद केले. आव्हानाचा पाठलाग करताना जळगाव कोगटा किंग्ज च्या सलामीची फळी अवघ्या १२ धावांवर असताना फुटली पहिला गडी अर्शद खान ने जितेंद्र नाईकच्या रूपाने घेतला. स्पर्धेत ऐन भरात असलेल्या ओम भोसलेने फटकेबाजीला सुरवात केली. मात्र त्याला नितालेश चौधरी ने विकेट देण्यास भाग पाडले. १७ चेंडू ३२ धावांवर यात ३ चौकार २ षटकार लगावत ओम भोसले ची आऊट झाला. यानंतर जगदीश झोपे यांनी कर्णधाराची साजेशी खेळी केली.

२५ चेंडूमध्ये ५ चौकार व ४ षटकार यांच्या मदतीने त्याने ६१ धावा काढून संघाला विजय मिळवून दिला. जळगाव कोगटा किंग्ज ने ५ गडी राखून अवघ्या १७ व्या षटकांत सामना आपल्या बाजूने केला. जगदीश झोपे सामनावीर म्हणून सन्मानीत करण्यात आले. निखेलेश चौधरी याला ११ निर्धार चेंडू टाकल्याने तर जगदीश झोपे याला सर्वाधिक ४ षटकार लगावल्याने सन्मानीत करण्यात आले. पारितोषिक वितरणाप्रसंगी जैन इरगिशनचे मानव संसाधन विभागचे वरिष्ठ सहकारी व्ही. एम. भट यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Tags: अमळनेर सुहांस जायंट्सअशोक जैनकोगटाकिंगक्रिकेट मॅचक्रिकेट लिंकजळगाव क्रिकेट लिंकजेसीएलजैन इरिगेशनटी ट्वेंटीफायनल मॅचमैदान
Previous Post

वाढत्या तापमानामुळे शहरातील चौकांमध्ये ‘वॉटर शॉवर’

Next Post

जळगावच्या संगीता पाटील यांची कॅट विमेन विंगच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जळगावच्या संगीता पाटील यांची कॅट विमेन विंगच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड

जळगावच्या संगीता पाटील यांची कॅट विमेन विंगच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif