• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

मागील महासभेचे इतिवृत्त कायम न करता चालवली महासभा !

महापौरांच्या प्रश्नावर आयुक्त व नगरसचिव अनुत्तरीय कायदेशीर, प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह;

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
April 15, 2026
in जळगाव, ब्रेकिंग, महापालिका
मागील महासभेचे इतिवृत्त कायम न करता चालवली महासभा !
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

जळगाव – योगेश सुने ( चीप एडिटर )
जळगाव महापालिकेची आज पार पडलेली महासभा राज्यातच नव्हे तर देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे. नियमांनुसार मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम केल्याशिवाय पुढील महासभेला सुरुवात केली जात नाही. मात्र आजच्या महासभेत ही प्रक्रिया न पाळता थेट सभेला सुरुवात करण्यात आल्याने राजकीय व सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आज जळगाव शहर महानगरपालिकेची महासभा महापौर दीपमाला काळे अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी उपमहापौर मनोज चौधरी, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, नगरसचिव शुक्ला  व्यासपीठावर उपस्थित होते

महापालिकेची अंदाजपत्रक मंजूर केलेली दि . 30 मार्च रोजी ची  महासभा या मागील महासभेचे इतिवृत्त कायम न करता आजच्या महासभेला सुरुवात करतांना, मागील महासभेचे इतिवृत्त आजच्या महासभेत वाचून मंजूर करणे अपेक्षित होते. त्यानंतरच नवीन विषयांवर चर्चा होणे गरजेचे असते. मात्र ही अनिवार्य प्रक्रिया टाळण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.

सभागृहात नगरसेविका अॅड. सुचिता हाडा यांनी हा मुद्दा उपस्थित करताच वातावरण चांगलेच तापले. यावर महापौरांनी नगरसचिवांकडे स्पष्टीकरण मागितले असता ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. आयुक्त देखील या प्रश्नावर अनुत्तरीय राहिल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनीही या प्रकारावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. “मागील सभेचे इतिवृत्त कायम केल्याशिवाय पुढील सभा घेता येत नाही. जर काही दुरुस्ती करायची असेल तर ती करूनच पुढील सभेला सुरुवात होते. मात्र आज ही प्रक्रिया का पाळली गेली नाही? मागील विषयांना मंजुरी दिली का नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

या संपूर्ण प्रकारामुळे महापालिकेच्या कामकाजाच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आजच्या सभेत मंजूर झालेल्या विषयांना कायदेशीर मान्यता मिळणार का, याबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे.

लिपिकांना कारणे दाखवा नोटीस 

आज झालेल्या महासभेतील प्रकारामुळे आयुक्तांनी नगरसचिव यांना शोकास नोटीस काढायला हवी होती परंतु तसे न करता नगर सचिव यांनी ही जबाबदारी लिपिकांवर ढकलली त्यांना शोकास नोटीस दिली अशी माहिती मिळत आहे. वास्तविकता कायदेशीर दृष्ट्या नगरसचिव यांनीच प्रोसिडिंग लिहिणे व पूर्ण करणे अपेक्षित आहे. व त्यानंतरच पुढील महासभेबाबत अजेंडा काढणे महत्त्वाचे होते परंतु या ठिकाणी मागील सभेचे प्रोसिडिंग कायम न करता सभेचा अजेंडा काढण्यात आला. व सभा चालवली गेली. यामुळे कायदेशीर पेच निर्माण झाला असून यामध्ये आयुक्तांनी नगरसचिवांवर कारवाई करणे आवश्यक होते. परंतु तसे झालेले दिसून येत नाही मात्र याबाबत महापौर काय निर्णय घेणार याकडे सभागृहाचे व जनतेचे लक्ष लागून आहे.

बातमी शेअर करा !
Tags: आयुक्तइतिवृत्तजळगावनगरसचिवन्यूजबातमीमहानगरपालिकामहापौरमहासभा
Previous Post

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Next Post

एल. एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचा इयत्ता १० वीचा १०० टक्के निकाल

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
एल. एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचा इयत्ता १० वीचा १०० टक्के निकाल

एल. एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचा इयत्ता १० वीचा १०० टक्के निकाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

June 4, 2026

जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

June 4, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 2, 2026
व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

June 2, 2026
“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

June 2, 2026
विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

May 31, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif