• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

महापौर दीपमाला काळे यांच्या संकल्पनेतून जळगावच्या दोन्ही ‘बी.जे. मार्केट’चा कायापालट

दोन दिवस राबवले विशेष स्वच्छता अभियान : अतिक्रमण, लाईट, बांधकाम विषयावरही सुरू झाले काम..!

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
April 4, 2026
in जळगाव, समस्या
महापौर दीपमाला काळे यांच्या संकल्पनेतून जळगावच्या दोन्ही ‘बी.जे. मार्केट’चा कायापालट
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्या निकाली काढण्यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेच्या कर्तव्यदक्ष महापौर दीपमाला काळे यांनी आक्रमक पाऊल उचलले आहे. ‘माझं जळगाव, स्वच्छ जळगाव’ या ब्रीदवाक्यानुसार, महापौरांच्या संकल्पनेतून गुरुवारी आणि शुक्रवारी जुन्या व नव्या दोन्ही बी.जे. मार्केटमध्ये विशेष साफसफाई अभियान राबवण्यात आले.

 

*नगरसेवकांच्या प्रश्नांची दखल, प्रशासनाची कारवाई*

नुकत्याच झालेल्या महासभेत शिवसेनेचे गटनेते विष्णू भंगाळे आणि नगरसेविका अर्चना पाटील यांनी मार्केटमधील अस्वच्छतेबाबत प्रश्न उपस्थित केले होते. या प्रश्नांची तातडीने दखल घेत आरोग्य विभागातर्फे गुरुवारी (२ एप्रिल) व शुक्रवारी (३ एप्रिल) स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यामध्ये मार्केटमधील प्रसाधनगृहांची पूर्ण स्वच्छता करण्यात आली. कर्तव्यात कसूर करणाऱ्या ठेकेदाराला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्याची कार्यवाहीदेखील सुरू झाली आहे.

 

*अतिक्रमण निर्मूलन आणि सोयी-सुविधांवर भर*

केवळ स्वच्छताच नाही, तर मार्केटचा परिसर मोकळा करण्यासाठी अतिक्रमण विभागाने आजूबाजूचे अतिक्रमण हटवले आहे. तसेच, विद्युत विभागातर्फे ज्या ठिकाणी पथदिवे नाहीत, तिथे सर्वेक्षण पूर्ण करून नवे दिवे लावण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. तुटलेले रेलिंग आणि इतर किरकोळ बांधकामांची पाहणी बांधकाम विभागाने केली असून, पुढील १५ दिवसांत हे काम पूर्ण करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे.

 

*महापौरांकडून थेट पाहणी आणि आदेश*

शुक्रवारी सकाळी महापौर दीपमाला काळे यांनी स्वतः मार्केटमध्ये जाऊन सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. यावेळी मार्केटमध्ये साचणारे पाणी आणि प्रसाधनगृहांच्या गळतीबाबत त्यांनी संताप व्यक्त करत, या त्रुटी तात्काळ दूर करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले.

 

*मार्केट असोसिएशनकडून महापौरांचे आभार*

मार्केटमधील बदल पाहून मार्केट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी महापौरांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. “अनेक वर्षांपासून या समस्या ‘जैसे थे’ होत्या, मात्र महापौरांच्या पुढाकारामुळे मार्केटने मोकळा श्वास घेतला आहे. हे अभियान यापुढेही सुरू राहावे, यासाठी आम्ही महापालिकेला पूर्ण सहकार्य करू,” असे आश्वासन पदाधिकाऱ्यांनी दिले.

 

हे अभियान आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त उदय पाटील यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी रमेश कांबळे, स्वच्छता निरीक्षक रुपेश भालेराव, मुकेश पाटील, मयूर सपकाळे, मुकादम विशाल चांगरे, बीव्हीजी सुपरवायझर संदीप शर्मा आणि गणेश कोळी यांच्या टीमने यशस्वी केले.

बातमी शेअर करा !
Tags: जळगावदीपमाला काळेबीजे मार्केटमहानगरपालिकामहापौर
Previous Post

जळगाव जिल्हा भाजपतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’

Next Post

शिरसोली परिसरात अवकाळी पाऊस व वादळाचा फटका; पिकांचे मोठे नुकसान

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
शिरसोली परिसरात अवकाळी पाऊस व वादळाचा फटका; पिकांचे मोठे नुकसान

शिरसोली परिसरात अवकाळी पाऊस व वादळाचा फटका; पिकांचे मोठे नुकसान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif