• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

आयटी आणि सुरक्षा एक्स्पो २०२६’ चे शानदार उद्घाटन!

खान्देश सेंट्रल मॉल येथे १३ ते १५ फेब्रुवारी पर्यंत प्रदर्शन; जिल्हाधिकाऱ्यांनी केले पदाधिकाऱ्यांचे कौतुक !

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
February 14, 2026
in जळगाव, वाणिज्य वार्ता
आयटी आणि सुरक्षा एक्स्पो २०२६’ चे शानदार उद्घाटन!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव – माहिती तंत्रज्ञान आणि सुरक्षा क्षेत्रातील नवनवीन बदलांची ओळख करून देण्यासाठी ‘जळगाव जिल्हा माहिती तंत्रज्ञान संघटना’ (JJITA) तर्फे आयोजित ‘JJITA आयटी आणि सुरक्षा एक्स्पो २०२६’ चे शानदार उद्घाटन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. १३) पार पडले. शहरातील खान्देश सेंट्रल मॉल येथे १३ ते १५ फेब्रुवारी दरम्यान हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे.

 

या सोहळ्याला जळगाव जिल्हा माहिती तंत्रज्ञान संघटनेचे अध्यक्ष अतुल पाटील, सीपी प्लसचे क्षेत्रीय व्यवस्थापक प्रविण पाटील, प्रमा कंपनीचे अंकुर ढोले, ऑल कनेक्टचे संदिप बिरारी, पवन मंधारे, चेतन गावंडे, पुणे असोसिएशनचे राहुल खुर्द, सिबा पाठक, आनंद जगदाळे, धुळे असोसिएशनचे प्रशांत देवरे यांची विशेष उपस्थिती होती.

 

जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमध्ये ‘एआय’चा वापर करणार – जिल्हाधिकारी

स्वतः सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेले जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी यावेळी तांत्रिक विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, “संगणकातील व्हायरस संक्रमणाबाबत विशेष काळजी घेणे गरजेचे असून सिक्युरिटी प्रॉडक्ट निवडताना गुणवत्तेवर भर दिला पाहिजे. जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमध्ये, विशेषतः सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ‘कम्प्युटर व्हिजन’ आणि ‘एआय आधारित अलर्ट जनरेशन’ तंत्रज्ञानाचा वापर आम्ही करणार आहोत. व्हिडिओ फीडच्या विश्लेषणातून एआयद्वारे चांगले निष्कर्ष काढता येतात.” आयटी आणि सिक्युरिटी इंडस्ट्रीमधील जनजागृती महत्त्वाची असल्याचे सांगत त्यांनी संघटनेच्या उपक्रमाचे कौतुक केले.

 

एक्स्पो मध्ये आयटी प्रॉडक्ट्स, अत्याधुनिक सिक्युरिटी सिस्टिम्स, एआय (AI) आधारित सीसीटीव्ही कॅमेरे आणि सोलर पॅनल यासह विविध स्टॉल लावण्यात आले आहेत.

दरम्यान प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी करत आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेतली.

 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघटनेचे उपाध्यक्ष सुनील घोलप, सचिव सुरेंद्र मेहेंदळे, योगेश चौधरी, विनोद सोनार, संदिप राठोड आणि निलेश जैन यांनी परिश्रम घेतले. जास्तीत जास्त नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा !
Tags: IT Expo 2026JalgaonJJITAजळगावजळगाव टेक्नॉलॉजी बातम्या
Previous Post

रामेश्वर कॉलनीत भीषण आग, २० ते २५ दुचाकी जळून खाक!

Next Post

मोबाईलच्या युगातही रेडिओचे महत्त्व अधिक!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
मोबाईलच्या युगातही रेडिओचे महत्त्व अधिक!

मोबाईलच्या युगातही रेडिओचे महत्त्व अधिक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जंक फूड मुक्त होळीचा विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश!

जंक फूड मुक्त होळीचा विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश!

March 2, 2026
चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

March 2, 2026
खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

March 1, 2026
जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

March 1, 2026
खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

February 28, 2026
स्थायी सभापतीपदी डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण सभापतीपदी सिंधुताई कोल्हे बिनविरोध निवड!

स्थायी सभापतीपदी डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण सभापतीपदी सिंधुताई कोल्हे बिनविरोध निवड!

February 27, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif