• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

‘ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना ‘वाचन प्रेरणा सन्मान’

वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी आणि ‘ती आणि मी’ पुस्तक घराघरांत पोहोचविण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल; विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या हस्ते मुंबईत सन्मान

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
October 22, 2026
in जळगाव, सांस्कृतिक
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव: भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी १५ ऑक्टोबर रोजी ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात येतो. हे औचित्य साधून भाषा संचालनालय, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन आणि शासकीय विधि महाविद्यालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वाचन प्रेरणा दिन २०२६’ विशेष सोहळ्याचे मुंबईत आयोजन करण्यात आले होते.

तळागाळात वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी तसेच वाचन संस्कार घडवण्यासाठी अविरतपणे मोलाचे योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील दहा वाचनदूतांचा विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्याहस्ते मानचिन्ह, सन्मानपत्र, ग्रंथभेट आणि रोख दहा हजार रुपये देऊन गौरव करण्यात आला. ग्रंथालये समृद्ध करणे, ग्रामीण आणि वंचित घटकांपर्यंत पुस्तके पोहचविणे तसेच नव्या पिढीला वाचनाकडे आकर्षित करणे यासाठी या वाचनदूतांनी राबवलेल्या उपक्रमांचे सचिन अहिर यांनी कौतुक करून अभिनंदन केले.

‘ती आणि मी’ हे पुस्तक जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. कंपनीचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांनी लिहिले असून मॅजेस्टीक प्रकाशनद्वारा प्रकाशित झाले आहे. हिंदी, इंग्रजी आणि पंजाबी भाषेत या पुस्तकाचा भावानुवाद झाला असून एक लाखाच्यावर प्रती वाचकांपर्यंत पोहचल्या आहेत. समर्पित सहजीवनाचं प्रेरणादायी आत्मकथनपर चिंतन अशी या पुस्तकाची ओळख आहे. घराघरात ‘ती आणि मी’ हे पुस्तक पोहचविण्यासाठी ‘वाचनगाडा’ गाडीच्या माध्यमातून विशेष उपक्रम राबविण्यात आले. महाराष्ट्रातल्या दूरवरच्या खेड्यापाड्यातील शाळा-महाविद्यालये तसेच ग्रंथालये आणि विविध संस्थांच्या माध्यमातून भाषणं-व्याख्यानं देत ज्ञानेश्वर शेंडे यांनी परिश्रम घेतले. ‘ती आणि मी’ पुस्तकाचे वितरण कार्य सुरू असताना वाचकांचा लेखकाशी झालेला पत्रसंवाद, या पुस्तकावरील भाषण, आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्राचा वृतांत तसेच परिसंवादातील विचारदर्शन यावर आधारित ‘ती आणि मी : प्रतिसाद’ हे पुस्तकही प्रकाशित झाले आहे. प्रस्तुत सन्मानाबद्दल जैन इरिगेशन कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन यांनी ज्ञानेश्वर शेंडे यांचे अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करा !
Tags: ज्ञानेश्वर शेंडेती आणि मी पुस्तकभाषा संचालनालय महाराष्ट्र शासनमराठी भाषा विभागवाचन प्रेरणा दिनवाचन प्रेरणा सन्मान २०२६
Previous Post

ग. स. सोसायटीचे विद्यमान संचालक भाईदास पाटील यांचे निधन

Next Post

माऊली नगरातील खून प्रकरणाचा छडा; संशयित आरोपी २४ तासांत जेरबंद

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post

माऊली नगरातील खून प्रकरणाचा छडा; संशयित आरोपी २४ तासांत जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माऊली नगरातील खून प्रकरणाचा छडा; संशयित आरोपी २४ तासांत जेरबंद

October 22, 2026

‘ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना ‘वाचन प्रेरणा सन्मान’

October 22, 2026

ग. स. सोसायटीचे विद्यमान संचालक भाईदास पाटील यांचे निधन

October 22, 2026

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूलमध्ये नवरात्री उत्सव व रावण दहन उत्साहात संपन्न.

October 20, 2026
जळगावात ‘जगदंब’च्या हुंकाराने महादौडीत उसळला जनसागर!

जळगावात ‘जगदंब’च्या हुंकाराने महादौडीत उसळला जनसागर!

October 20, 2026
नशामुक्त जळगाव अभियानासाठी जैन उद्योग समूह सदैव सोबत – अशोक जैन.

नशामुक्त जळगाव अभियानासाठी जैन उद्योग समूह सदैव सोबत – अशोक जैन.

October 18, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif