• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

माऊली नगरातील खून प्रकरणाचा छडा; संशयित आरोपी २४ तासांत जेरबंद

एमआयडीसी पोलिसांची वेगवान कारवाई; सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा शोध

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
October 22, 2026
in जळगाव, क्राईम
माऊली नगरातील खून प्रकरणाचा छडा; संशयित आरोपी २४ तासांत जेरबंद
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क 

जळगाव : माऊली नगर, खेडी बुद्रुक येथे दुचाकीची लाईट सुरू-बंद केल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून धारदार चॉपरने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर दुसरी व्यक्ती गंभीर जखमी झाली. या प्रकरणातील संशयित आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत ताब्यात घेतले आहे. मयूर चैत्राम जाधव (रा. माऊली नगर, खेडी बुद्रुक) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माऊली नगर येथे मंगळवारी रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास संशयित मयूर जाधव मोटारसायकलवरून आला. त्याने रस्त्याच्या कडेला बसलेल्या महिलांच्या दुचाकीची लाईट वारंवार सुरू-बंद करण्यास सुरुवात केली. याबाबत जाब विचारण्यासाठी किरण विठ्ठल पाटील (वय ४४) आणि किशोर छगन पाटील (वय ३५, दोघे रा. माऊली नगर, खेडी बुद्रुक) पुढे आले. त्यावेळी संशयिताने संतापातून धारदार चॉपरने दोघांवर वार केल्याचे वृत्त आहे.

या हल्ल्यात किरण पाटील यांचा मृत्यू झाला, तर किशोर पाटील गंभीर जखमी झाले. जखमी किशोर पाटील यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी गुन्हे शोध पथकाला तातडीने तपास करण्याचे निर्देश दिले. पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने संशयिताचा शोध घेण्यात आला.

पोलिसांच्या या तपासानंतर मयूर चैत्राम जाधव याला घटनेच्या २४ तासांच्या आत ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी किशोर पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास एमआयडीसी पोलीस आणि गुन्हे शोध पथक करीत आहेत.

बातमी शेअर करा !
Tags: एमआयडीसी पोलीसकिरण विठ्ठल पाटीलखेडी बुद्रुकजळगाव क्राइम न्यूजमयूर चैत्राम जाधवमाऊली नगर खून प्रकरण
Previous Post

‘ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना ‘वाचन प्रेरणा सन्मान’

Next Post

खाऊ गल्लीतील स्वच्छता करण्याचे अन् दंडात्मक कारवाईचे निर्देश

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
खाऊ गल्लीतील स्वच्छता करण्याचे अन् दंडात्मक कारवाईचे निर्देश

खाऊ गल्लीतील स्वच्छता करण्याचे अन् दंडात्मक कारवाईचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खाऊ गल्लीतील स्वच्छता करण्याचे अन् दंडात्मक कारवाईचे निर्देश

खाऊ गल्लीतील स्वच्छता करण्याचे अन् दंडात्मक कारवाईचे निर्देश

October 22, 2026
माऊली नगरातील खून प्रकरणाचा छडा; संशयित आरोपी २४ तासांत जेरबंद

माऊली नगरातील खून प्रकरणाचा छडा; संशयित आरोपी २४ तासांत जेरबंद

October 22, 2026
‘ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना ‘वाचन प्रेरणा सन्मान’

‘ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना ‘वाचन प्रेरणा सन्मान’

October 22, 2026
ग. स. सोसायटीचे विद्यमान संचालक भाईदास पाटील यांचे निधन

ग. स. सोसायटीचे विद्यमान संचालक भाईदास पाटील यांचे निधन

October 22, 2026

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूलमध्ये नवरात्री उत्सव व रावण दहन उत्साहात संपन्न.

October 20, 2026
जळगावात ‘जगदंब’च्या हुंकाराने महादौडीत उसळला जनसागर!

जळगावात ‘जगदंब’च्या हुंकाराने महादौडीत उसळला जनसागर!

October 20, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif