• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

पंतप्रधान सायकल रॅलीमध्ये जळगावचे नाव उंचावले!

पुणे ते दिल्ली रॅली फत्तेकेलेल्या खुशबू गोसावीचा आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते गौरव!

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
February 1, 2026
in महाराष्ट्र, मॅरेथॉन
पंतप्रधान सायकल रॅलीमध्ये जळगावचे नाव उंचावले!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव – ‘शौर्याचे पाऊल क्रांतीच्या दिशेने’ टाकत महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या ‘पंतप्रधान सायकल रॅली २०२६’ मध्ये सहभागी होऊन एस.यु.ओ. खुशबू गोसावी हिने पुणे ते नवी दिल्ली हा खडतर प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला आहे. खुशबूचे रविवारी शिव कॉलनी चौकामध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. या दैदिप्यमान यशाबद्दल जळगाव शहराचे आ. राजूमामा भोळे यांच्या हस्ते खुशबूचा गौरव करण्यात आला.

 

एनसीसी कॅडेट खुशबू गोसावी हिने पुणे ते नवी दिल्ली दरम्यानच्या या सायकल मोहिमेत आपल्या जिद्दीच्या जोरावर यश मिळवले. ही मोहिम एनसीसी महाराष्ट्रच्या इतिहासातील एक मैलाचा दगड मानली जात आहे. तिच्या या यशाने जळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

 

खुशबूच्या या कामगिरीचे कौतुक करण्यासाठी शिव कॉलनी चौकात नागरिकांनी उपस्थिती दिली. नगरसेविका अंकिता पंकज पाटील व सामाजिक कार्यकर्ते पंकज सुरेश पाटील यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी आ. राजूमामा भोळे यांनी खुशबूच्या ध्येयवेड्या प्रवासाचे कौतुक करत तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

“जळगावच्या मुलीने दिल्लीपर्यंत सायकलने प्रवास करून महिला शक्तीचा परिचय करून दिला आहे,” अशा भावना यावेळी आ. राजूमामा भोळे यांनी व्यक्त केल्या. याप्रसंगी खुशबू गोसावी हिचा परिवार, शिव कॉलनी परिसरातील ग्रामस्थ आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

बातमी शेअर करा !
Tags: prime minister cycle rally khushbu gosavi ncc cadet pune to delhi cycle rally jalgaon news maharashtra ncc rajumaama bhole women empowerment marathi news navarajya live
Previous Post

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या विशेष पदग्रहण सोहळा उत्साहात

Next Post

जळगावात अजितदादांना सर्वपक्षीय भावपूर्ण श्रद्धांजली

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post

जळगावात अजितदादांना सर्वपक्षीय भावपूर्ण श्रद्धांजली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

April 17, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif