• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home यश निवड

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या विशेष पदग्रहण सोहळा उत्साहात

प्रदेश उपाध्यक्षपदी विनायकराव दिवटे, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी मुराद पटेल, सचिव मंगल पाटील : जिल्हाध्यक्ष चेतन वाणी तर शहराध्यक्षपदी जितेंद्र कोतवाल.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
February 1, 2026
in यश निवड
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या विशेष पदग्रहण सोहळा उत्साहात
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव (प्रतिनिधी) : येथील गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे रविवारी दि. १ फेब्रुवारी रोजी पद्मालय विश्राम गृहात विशेष कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विनायकराव दिवटे, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी वसंत दिलीप पाटील, कार्याध्यक्षपदी मुराद पटेल तर सचिवपदी मंगल पाटील,जळगाव जिल्हाध्यक्ष म्हणून चेतन रवींद्र वाणी यांची तर शहराध्यक्ष म्हणून जितेंद्र कोतवाल यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच इतरही सदस्यांना पदाधिकारीपदी नियुक्त करण्यात आले.

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे पद्मालय विश्राम गृहात रविवारी विशेष कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मंचावर केंद्रीय अध्यक्ष नरेंद्र कदम, केंद्रीय कार्याध्यक्ष सागर ओतारी, उपाध्यक्ष रवींद्र पवार, केंद्रीय सचिव भगवान सोनार, खजिनदार ललित खरे, सदस्य गणेश पाटील, साक्री ता. धुळे येथील संघटनेच्या पदाधिकारी जोशीला पगारिया तसेच ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत यादव, डॉ. दिलीप तिवारी, राजेश यावलकर उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते श्री गणेशाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर प्रस्तावनेमधून, अध्यक्ष नरेंद्र कदम यांनी कार्यक्रम घेण्यामागील उद्देश्य स्पष्ट करून संस्थेची ध्येयधोरणे स्पष्ट केली.

यानंतर मान्यवरांनी आपल्या मनोगतातून संघटनेविषयी कौतुक करून पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाला संघटनेच्या माध्यमातून एकजुट दाखवून वेळोवेळी आवाज उठवू या असे सांगितले. यामध्ये जेष्ठ पत्रकार दिलीप तिवारी, चंद्रकांत यादव, राजेश यावलकर, जोशीला पगारिया, रवींद्र पवार यांनी मनोगत व्यक्त केले. पत्रकारांच्या समस्येसह पाल्यांच्या शिक्षण, रोजगार, आरोग्याच्या दृष्टिकोनातून संघटनेच्या माध्यमातून आपण सतत कार्यरत राहूया असेही आवाहन यावेळी मान्यवरांच्या वतीने करण्यात आले.

यावेळी विविध निवड प्रक्रिया जाहीर करून मान्यवरांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यात उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी वसंतराव पाटील, कार्याध्यक्षपदी चाळीसगावचे मुराद पटेल, उपाध्यक्षपदी दीपक कुलकर्णी, सचिवपदी जळगाव तालुक्यातील मंगल पाटील, संघटकपदी राकेश विजय वाणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच जळगाव जिल्हाध्यक्षपदी चेतन रवींद्र वाणी, जिल्हा कार्याध्यक्षपदी हेमंत सुरेश पाटील, जिल्हा सचिवपदी वसीम शब्बीर खान यांची एकमताने निवड करण्यात आली.

जिल्हा उपाध्यक्षपदी धानोऱ्याचे प्रशांत सोनवणे, सुमित सुरेश देशमुख, लोहा-याचे दीपक वामन पवार, जिल्हा सहसचिव म्हणून राजेंद्र यु. पाटील, खजिनदार म्हणून पंकज शेटे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख म्हणून विश्वजीत चौधरी यांची नियुक्ती झाली. जळगाव शहर अध्यक्षपदी जितेंद्र संतोष कोतवाल तर शहर कार्याध्यक्षपदी जकी अहमद,  सचिव योगेश रमेश चौधरी यांची एकमताने नियुक्ती झाली. शहर उपाध्यक्ष म्हणून पवन खंबायत, नितीन पुंडलिक सोनवणे, निखिल अशोक मोरे, सहसचिवपदी नरेश प्रधान बागडे यांची नियुक्ती झाली.

तर शहर खजिनदार म्हणून गोकुळ सोनार, शहर संघटक म्हणून भूषण हंसकर,  सहसंघटक म्हणून राजेंद्र रामराव पाटील तसेच सदस्य म्हणून इकबाल पटेल यांची निवड करण्यात आली आहे. या सर्व निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन त्यांच्यावर आगामी काळात मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे.

सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी एकमताने, आम्ही संघटनेचे कार्य जोमाने पुढे नेऊ. पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणाच्या दृष्टिकोनातून विविध कार्यक्रमांची आखणी करू असे आश्वासन यावेळी दिले. सूत्रसंचालन भगवान सोनार यांनी केले. तर आभार विश्वजीत चौधरी यांनी मांडले. कार्यक्रमासाठी गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या विविध पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा !
Tags: #brekingnews #Jalgaon #news #
Previous Post

वाहतूक सुरक्षा सप्ताहात पोलिसांची हेल्मेट रॅली

Next Post

पंतप्रधान सायकल रॅलीमध्ये जळगावचे नाव उंचावले!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
पंतप्रधान सायकल रॅलीमध्ये जळगावचे नाव उंचावले!

पंतप्रधान सायकल रॅलीमध्ये जळगावचे नाव उंचावले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

देवदत्त गोखले यांना पीएच.डी. प्रदान; संशोधनातून स्वप्नपूर्तीचा आनंद!

देवदत्त गोखले यांना पीएच.डी. प्रदान; संशोधनातून स्वप्नपूर्तीचा आनंद!

June 5, 2026
जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

June 4, 2026
जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

June 5, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 2, 2026
व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

June 2, 2026
“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

June 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif