झेडपी निवडणुकीचा बिगुल वाजला…
जळगाव वगळता १२ जिल्हा परिषदा, १२५पंचायत समित्यांची निवडणूक जाहीर
नवराज्य Live न्यूज नेटवर्क.
मुंबई – राज्यातील रखडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांना अखेर मुहूर्त मिळाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी १२ जिल्हा परिषदा आणि त्यांच्या अंतर्गत असलेल्या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला असला तरी जळगाव जिल्हा परिषद मात्र यातून वगळण्यात आली असून, दि. ५ फेब्रुवारीला मतदान तर दि. ७ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली.
जळगाव जि प निर्णय 21 जानेवारी नंतर…
आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषदांना या टप्प्यातून वगळण्यात आले असून, संबंधित भागात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. जळगाव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर टांगती तलवार कायम असून त्यावर दि. २१जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका एकाच वेळी घेतल्या जाणार आहेत.







