• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

भाजपचे निष्ठावान कार्यकर्त्यांना अश्रू अनावर,अन मामांचे डोळेही पान्हावले

आ.राजू मामा महायुतीपुढे विविष ; निष्ठावंतांचे तिकीट कापले, भाजपमध्ये खदखद वाढली..!

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
December 31, 2025
in Uncategorized, जळगाव, निवडणूक, महापालिका रणसंग्राम, राजकारण
भाजपचे निष्ठावान कार्यकर्त्यांना अश्रू अनावर,अन मामांचे डोळेही पान्हावले
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

भाजपचे निष्ठावान कार्यकर्त्यांना अश्रू अनावर

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : भारतीय जनता पक्षाच्या तिकीट वाटपाची प्रतीक्षा करणाऱ्या अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरल्याचे चित्र मंगळवारी स्पष्ट झाले. तिकीट जाहीर होताच एकामागोमाग एक नावे समोर आली आणि बर्‍याच जणांच्या चेहऱ्यावर निराशेची छाया पसरली. शहरातील एका खासगी हॉटेलमध्ये आयोजित बैठकीत आमदार राजू मामा भोळे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी आपली नाराजी मोकळेपणाने व्यक्त केली. या वेळी वातावरण भावनिक झाले आणि काहींचे अश्रू ओघळल्याचे पाहायला मिळाले. आमदार भोळेंनाही या परिस्थितीने गहिवरल्याचे जाणवत होते.

महालातील सूचनांनुसार महायुतीचा फॉर्म्युला राबविण्यासाठी स्थानिक पातळीवर तडजोड करावी लागली. त्यामुळे अनेक ठिकाणी स्वबळावर काम करणाऱ्या आणि वर्षानुवर्षे पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा मार्ग कापला गेल्याची भावना व्यक्त होत आहे. तिकीट वाटपाच्या प्रक्रियेत निष्ठावंतांपेक्षा युतीच्या समीकरणांना प्राधान्य दिल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली.

बैठकीत कार्यकर्त्यांनी खुलेपणाने मांडणी करताना म्हटले —

“लोकसभा, विधानसभा, नगरपालिका — कुठेही आम्ही मागे राहिलो नाही. प्रचारात, पक्षाच्या कार्यक्रमात, उपक्रमात आम्ही मनापासून श्रम आणि पैसा घातला. लाखोंची गुंतवणूक केली, जनसंपर्क केला… तरी संधी आमच्यापासून दूर ठेवली जाते. आता तरी युतीचा पुनर्विचार करा; स्वबळावर लढण्याचा विचार करा.”

“दुसऱ्याचा झेंडा हातात घेऊन फिरायचे कशासाठी? आमची ओळख, आमची कामगिरी, आमच्या मतदारांच्या भावना कोण समजणार?” असा सवालही काही कार्यकर्त्यांनी केला.

या सर्व घडामोडींमुळे महाराष्ट्रातील महायुतीचा फॉर्म्युला अंतिम करण्यात आला असला तरी जळगावमध्ये नाराजी, अस्वस्थता आणि अंतर्गत खदखद वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत.

बातमी शेअर करा !
Tags: #JalgaonPolitics #JalgaonMahapalika #BJPWorkersAngry #NishthavantKaaryakarte #TicketDistribution #MahayutiFormula #PoliticalTension #JalgaonNews #RajkaranUpdate
Previous Post

विद्यमान नगरसेवकांचे तिकीट कापले.

Next Post

गोलाणी मार्केट मध्ये चाकू हल्ल्यात एक गंभीर.

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
गोलाणी मार्केट मध्ये चाकू हल्ल्यात एक गंभीर.

गोलाणी मार्केट मध्ये चाकू हल्ल्यात एक गंभीर.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif