• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

गोलाणी मार्केट मध्ये चाकू हल्ल्यात एक गंभीर.

आरोपीला घटनास्थळावरून अटक ; हल्ल्यातील  गंभीर तरुनाला नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
December 31, 2025
in Uncategorized, क्राईम, घटना, जळगाव, ब्रेकिंग
गोलाणी मार्केट मध्ये चाकू हल्ल्यात एक गंभीर.
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

गोलाणी मार्केट मध्ये चाकू हल्ल्यात एक गंभीर

आरोपीला घटनास्थळावरून अटक ; हल्ल्यातील  गंभीर तरुनाला नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले.

जळगाव – गोलाणी मार्केट परिसरात आज, बुधवारी ३१ डिसेंबर रोजी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास एका १८ वर्षीय तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, परिसरातील नागरिकांनी तत्परता दाखवत आरोपीला जागीच पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

साई गणेश बोराडे (वय १८, रा. डीएनसी कॉलेजजवळ, जळगाव) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास साई हा गोलाणी मार्केट परिसरात होता. यावेळी संशयित आरोपी शुभम सोनवणे (रा. कलिंका माता मंदिर परिसर) याने जुन्या किंवा अज्ञात कारणावरून साईशी वाद घातला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि शुभमने आपल्याकडील चाकूने साईच्या छातीवर सपासप वार केले.

गजबजलेल्या ठिकाणी अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. मात्र, यावेळी तेथील स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांनी घाबरून न जाता हिंमत दाखवली. त्यांनी पळून जाणाऱ्या संशयित आरोपी शुभम सोनवणे याला रंगेहात पकडले आणि तातडीने शहर पोलिसांना पाचारण करून त्यांच्या स्वाधीन केले.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या साई बोराडे याला नागरिकांनी तातडीने एका रिक्षामध्ये टाकून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (सिव्हिल हॉस्पिटल) उपचारासाठी दाखल केले. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, या हल्ल्यामागचे नेमके कारण काय होते, याचा तपास पोलीस करत आहेत.

बातमी शेअर करा !
Tags: #GavnikJalgaon #JalgaonLive #JalgaonBreakingNews #JalgaonCrime #GolaniMarket #KnifeAttack #CrimeUpdate #ShockingNews #BreakingNewsMarathi #JalgaonToday #JalgaonUpdates
Previous Post

भाजपचे निष्ठावान कार्यकर्त्यांना अश्रू अनावर,अन मामांचे डोळेही पान्हावले

Next Post

महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाने उघडले खाते

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाने उघडले खाते

महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाने उघडले खाते

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जंक फूड मुक्त होळीचा विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश!

जंक फूड मुक्त होळीचा विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश!

March 2, 2026
चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

March 2, 2026
खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

March 1, 2026
जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

March 1, 2026
खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

February 28, 2026
स्थायी सभापतीपदी डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण सभापतीपदी सिंधुताई कोल्हे बिनविरोध निवड!

स्थायी सभापतीपदी डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण सभापतीपदी सिंधुताई कोल्हे बिनविरोध निवड!

February 27, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif