• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

समाज बदलविण्यासाठी क्रांतिकारी विचारांची आवश्यकता.

राज्यस्तरीय संविधान सन्मान संमेलन प्रसंगी संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे यांचे प्रतिपादन

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
November 29, 2025
in Uncategorized, महाराष्ट्र, संमेलन
समाज बदलविण्यासाठी क्रांतिकारी विचारांची आवश्यकता.
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live डिजिटल न्यूज नेटवर्क 

जळगाव –  समाज बदलवण्यासाठी बाईट नव्हे, तर क्रांतिकारी विचारांची आवश्यकता आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलेले क्रांतिकारी संविधान आज धोक्यात आले आहे. मानवी हक्कांवर गदा आणण्याचे प्रयत्न सुरू असून अशा परिस्थितीत सामान्य जनतेने उठाव करणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यस्तरीय संविधान सन्मान संमेलनाचे संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी केले.

विचारमंचावर व्यंगकवी संपत सरल, न्यायमूर्ती (नि.) बी. जे. कोळसे पाटील, श्रीधर अंभोरे, निरज जैन, माजी आमदार शिरीष चौधरी, उद्योजक संजय इंगळे, अॅड. राजेश झाल्टे, गौतम खंडारे, शालिग्राम गायकवाड, खलील देशमुख, वासंती दिघे, मुख्य संयोजक मुकुंद सपकाळे, स्वागताध्यक्ष डॉ. करीम सालार, भारती रंधे, जयसिंग वाघ, डॉ. मिलिंद बागूल, डॉ. सत्यजित साळवे आदी मान्यवर उपस्थित होते.

. सत्ताधाऱ्यांकडून संविधानाच्या मूल्यांना तडा देण्याचे प्रयत्न होत असून, संविधानाची पूजा करणारे ‘भक्त’ तयार करण्यामागे त्यांचे राजकीय हेतू असल्याची टीकाही त्यांनी केली.यावेळी शहरातील नागरिकांनी कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात हजेरी लावली.

 

कार्यक्रमाची सुरुवात घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि संविधान गीताने झाली. डॉ. मिलिंद बागूल यांनी राज्यस्तरीय संविधान सन्मान संमेलन घेण्यामागील भूमिका स्पष्ट केली. डॉ. करीम सालार यांनी संविधान रक्षणाच्या लढाईत जळगावकर अग्रस्थानी आहेत असा अभिमान व्यक्त केला. मुख्य संयोजक मुकुंद सपकाळे यांनी संविधानाचा होणारा अपमान रोखण्यासाठीच हे संमेलन आयोजित करण्यात आल्याचे सांगितले.

 

संमेलनात संविधान सन्मान पुरस्कार प्रदान

यावेळी ‘आम्ही भारताचे लोक’ या स्मरणिकेचे प्रकाशन झाले. संमेलनात राज्यस्तरीय संविधान सन्मान पुरस्कार डॉ. श्रीराम सोनवणे, प्रा. अशोक पवार, कांता रमेश अहिरे, शीला मुरलीधर पवार यांना प्रदान करण्यात आला. तर ‘परिवर्तन साहित्य आणि समीक्षा’ व ‘परिवर्तन समीक्षा आणि विचार’ डॉ. मिलिंद बागूल, ‘खिचडी’ अ. फ. भालेराव, ‘गुरु गौरव’ डॉ. मारूती कसाब यांच्या पुस्तकांचे प्रकाशन झाले. सूत्रसंचालन बापूराव पानपाटील तर आभार डॉ. सत्यजित साळवे यांनी मानले. यशस्वीतेसाठी चेतन ननवरे, महेंद्र केदार, अनिल सुरडकर, बापू शिरसाठ, सुभाष सपकाळे, चंद्रशेखर अहिरराव, साहेबराव बागुल, दत्तू सोनवणे, गौतम खंडारे, शालिक गायकवाड, वासंती दिघे, खलील देशमुख आदींनी परिश्रम घेतले.

 

संविधानासाठी लढाई लढा

माजी न्यायमूर्ती बी. जे. कोळसे पाटील यांनी संविधान अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येकाने रस्त्यावर येऊन अस्तित्वाची लढाई लढली पाहिजे. असे सांगितले. तर संपत सरल यांनी संविधान व आरक्षण चळवळ सोशल मीडियावरून लढता येणार नाही. जमिनीवरची रस्त्यावरची लढाई हवी. प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे की सत्ताधाऱ्यांकडून संविधानाची अंमलबजावणी योग्य व्हावी. त्यांनी आपल्या व्यंग कवितांमधून सध्याच्या संविधानविरोधी वातावरणावर परखड टीका केली.

बातमी शेअर करा !
Previous Post

ट्रॅव्हल्सचा निष्काळजीपणा : मध्यरात्री 31 प्रवासी अडचणीत

Next Post

क्राइम पेट्रोल मालिकेतून घेतला गुन्हेगारीचा धडा..

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
क्राइम पेट्रोल मालिकेतून घेतला गुन्हेगारीचा धडा..

क्राइम पेट्रोल मालिकेतून घेतला गुन्हेगारीचा धडा..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

June 4, 2026

जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

June 4, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 2, 2026
व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

June 2, 2026
“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

June 2, 2026
विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

May 31, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif