• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

ट्रॅव्हल्सचा निष्काळजीपणा : मध्यरात्री 31 प्रवासी अडचणीत

खाकीतली माणुसकी ; पुणे पोलिसांनी प्रवाशांची केली सुखरूप सुटका .

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
November 29, 2025
in Uncategorized, आपत्ती, महाराष्ट्र
ट्रॅव्हल्सचा निष्काळजीपणा : मध्यरात्री 31 प्रवासी अडचणीत
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live डिजिटल न्यूज नेटवर्क 

जळगाव – खासगी प्रवाशांच्या सुरक्षिततेची व सोयीची पर्वा न करता त्यांना रस्त्यावर सोडल्याचा संतापजनक प्रकार ‘संगीतम ट्रॅव्हल्स’कडून घडला आहे. पुणे–जळगाव मार्गावर गुरुवारी रात्री ट्रॅव्हल्सची बस (MH 19 CX 8884) शिरूर बायपास परिसरात अचानक बंद पडली. डिझेल पाइप खराब झाल्यामुळे बस रस्त्याच्या कडेला तासन्तास उभी राहिली. मात्र कंपनीने ३१ प्रवाशांसाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता त्यांना अडचणीत ठेवले.

पुणे पोलिसांची खाकीतली माणुसकी……

प्रवाशांनी पर्यायी वाहनाची मागणी केली असता चालक व मालकाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने प्रवासी संतप्त झाले. अखेर कोणताही मार्ग न दिसल्याने प्रवाशांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी गंभीरतेचा विचार करून दोन टेम्पो ट्रॅव्हलर्सची व्यवस्था केली. शुक्रवारी पहाटे ४ वाजता दोन्ही वाहने प्रवाशांना घेऊन जळगावकडे रवाना झाली.

ट्रॅव्हल्स कार्यालयात गोंधळ…..

दुपारी १२ वाजता सर्व प्रवासी या टेम्पो ट्रॅव्हलर्सने थेट जळगावातील स्टेडियम चौकातील संगीतम ट्रॅव्हल्स कार्यालयात पोहोचले. त्यांनी तिकिटांचे पैसे परत देण्याची मागणी केली. मात्र कर्मचाऱ्यांनी सुरुवातीस पैसे देण्यास नकार दिला.
मालकाकडून प्रतिसाद न मिळाल्याने “तुम्ही तक्रार करा” असे उत्तर देण्यात आले. यामुळे प्रवासी अधिक आक्रमक झाले. जवळपास तासभर गोंधळ झाल्यानंतर अखेर टेम्पो ट्रॅव्हलर्सचे ४२ हजारांचे बिल भरण्यास कंपनीने होकार दिल्यावर परिस्थिती शांत झाली.

बातमी शेअर करा !
Tags: #JalgaonNews #TravelsMujori #SangeetamTravels #PassengerTrouble #PuneJalgaonRoute #TravelMismanagement #PassengerSafety #BreakingNewsJalgaon #LocalNewsUpdate #PoliceAction
Previous Post

राष्ट्रवादी कार्यालयात महात्मा फुले यांना अभिवादन .

Next Post

समाज बदलविण्यासाठी क्रांतिकारी विचारांची आवश्यकता.

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
समाज बदलविण्यासाठी क्रांतिकारी विचारांची आवश्यकता.

समाज बदलविण्यासाठी क्रांतिकारी विचारांची आवश्यकता.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेळगाव बॅरेजमध्ये मासेमारीसाठी गेलेला नशिराबादचा तरुण वाहून गेला!

शेळगाव बॅरेजमध्ये मासेमारीसाठी गेलेला नशिराबादचा तरुण वाहून गेला!

September 6, 2026
युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार!

युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार!

September 6, 2026
गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

September 5, 2026
युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif