जळगाव, दि. ११ नोव्हेंबर (प्रतिनिधी)
जळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत आज महानगरपालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या सोडतीत यंदा महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात आले असून, महिलांना राजकारणात पुढे येण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
या निवडणुकीत एकूण ७५ नगरसेवक निवडले जाणार आहेत. १९ प्रभागांपैकी १८ प्रभाग चार सदस्यीय, तर एक प्रभाग तीन सदस्यीय ठेवण्यात आला आहे. सोडतीनुसार प्रत्येक प्रभागासाठी अनुसूचित जाती, मागासवर्गीय, खुला महिला आणि सर्वसाधारण अशा गटांनुसार आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.
महिलांसाठी आरक्षणाची ही घोषणा होताच विविध सामाजिक, महिला संघटनांनी आनंद व्यक्त केला आहे. या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढणार असून, राजकीय सक्षमीकरणाचे हे ऐतिहासिक पाऊल असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.
आरक्षण निश्चिती व सोडत कार्यक्रम
प्रभाग क्रमांक अ ब क ड नुसार
१ अ अनुसूचित जाती महिला
ब नागरिकांचा मागासवर्ग
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
२ अ अनुसूचित जमाती
ब नागरिकांचा मागासवर्ग महिला
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
३ अ अनुसूचित जाती महिला
ब अनुसूचित जमाती महिला
क नागरिकांचा मागासवर्ग
ड सर्वसाधारण
४ अ अनुसूचित जाती महिला
ब नागरिकांचा मागासवर्ग
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
५ अ नागरिकांचा मागासवर्ग
ब सर्वसाधारण महिला
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
६ अ नागरिकांचा मागासवर्ग महिला
ब सर्वसाधारण महिला
क सर्वसाधारण
ड सर्वसाधारण
७ अ नागरिकांचा मागासवर्ग महिला
ब सर्वसाधारण महिला
क सर्वसाधारण
ड सर्वसाधारण
८अ नागरिकांचा मागासवर्ग
ब सर्वसाधारण महिला
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
९अ नागरिकांचा मागासवर्ग महिला
ब सर्वसाधारण महिला
क सर्वसाधारण
ड सर्वसाधारण
१० अ अनुसूचित जाती
ब नागरिकांचा मागासवर्ग महिला
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
११ अ अनुसूचित जमाती महिला
ब नागरिकांचा मागासवर्ग
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
१२ अ अनुसूचित जाती
ब नागरिकांचा मागासवर्ग महिला
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
१३ अ नागरिकांचा मागासवर्ग
ब सर्वसाधारण महिला
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
१४ अ नागरिकांचा मागासवर्ग
ब सर्वसाधारण महिला
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
१५ अ नागरिकांचा मागासवर्ग महिला
ब सर्वसाधारण महिला
क सर्वसाधारण
ड सर्वसाधारण
१६ अ नागरिकांचा मागासवर्ग
ब सर्वसाधारण महिला
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण
१७अ नागरिकांचा मागासवर्ग महिला
ब सर्वसाधारण महिला
क सर्वसाधारण
ड सर्वसाधारण
१८ अ अनुसूचित जमाती
ब नागरिकांचा मागासवर्ग महिला
क सर्वसाधारण महिला
X
१९अ नागरिकांचा मागासवर्ग महिला
ब नागरिकांचा मागासवर्ग
क सर्वसाधारण महिला
ड सर्वसाधारण







