नवराज्य live न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी – मुंबई येथील शिवसेना मुख्यालयातून जळगाव जिल्ह्यातील शिवसेना श्रमिक कामगार सेनेचे जिल्हा उपाध्यक्षपद रामकृष्ण काटोले यांना बहाल करण्यात आले आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या कार्यक्षमता, निष्ठा आणि पक्षनिष्ठेवर विश्वास ठेवून ही जबाबदारी सोपवली आहे.
या नियुक्तीच्या वेळी शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे, श्रमिक कामगार सेनेचे प्रदेश सचिव अमितजी भटनाकर, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जिल्हाप्रमुख के. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्तीपत्र देण्यात आले.
रामकृष्ण काटोले यांच्या या निवडीबद्दल शिवसेना पदाधिकारी, सामाजिक बांधव, तसेच बारी समाजातील मान्यवर यांनी हार्दिक अभिनंदन करत भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.







