• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

युवकांनी उद्योजकतेच्या दिशेने वाटचाल करावी-मंत्री सावकारे

चर्मकार विकास संघ आयोजित वधू-वर व पालक परिचय मेळाव्यात — ५३५ वधू-वरांचा परिचय

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
November 4, 2025
in Uncategorized
युवकांनी उद्योजकतेच्या दिशेने वाटचाल करावी-मंत्री सावकारे
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

 

नवराज्य live न्यूज नेटवर्क

जळगाव (प्रतिनिधी) : युवकांनी नोकरीच्या मागे न पडता उद्योगाच्या दिशेने वाटचाल करावी.असे प्रतिपादन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी केले ते चर्मकार विकास संघ, महाराष्ट्र राज्य आयोजित वधुवर परिचय मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते.  राज्य व परराज्यातील वधू-वरांच्या प्रथम पसंतीचा तृतीय वधू-वर व पालक परिचय मेळावा रविवार, दि २ नोव्हेंबर  रोजी सरदार वल्लभभाई पटेल सभागृह, जळगाव येथे संपन्न झाला. ५३५ वधू-वरांनी परिचय दिला.

 

 

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय नामदार श्री. संजयजी सावकारे, वस्त्रोद्योग मंत्री, महाराष्ट्र राज्य उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार श्री. राजू मामा भोळे, संस्थापक प्रदेशाध्यक्ष श्री. संजयजी खामकर, माजी महापौर व जिल्हा शिवसेना प्रमुख श्री. विष्णूभाऊ भंगाळे, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष श्री. दीपकभाऊ सूर्यवंशी, महिला प्रदेश उपाध्यक्ष डॉ. केतकीताई पाटील, डॉ. संदीप भारूळे, सरपंच श्री. राजेश वाडेकर, मुख्य अभियंता श्री. राजेंद्र बाविस्कर, ऊर्जा विभागाचे निरीक्षक श्री. गणेशजी सुरडकर, प्रदेश उपाध्यक्ष श्री. विश्वनाथजी सावकारे, राज्यकारणी सदस्य श्री. संजय वानखेडे, जिल्हाध्यक्ष अॅड. डॉ. अर्जुन भारुडे,उप कार्यकारी अभियंता श्री.महेश तांबे, जिल्हा सचिव प्रा. धनराज भारुडे, प्रदेश सहसचिव अॅड. चेतन तायडे, श्री. वसंतराव नेटके, प्रकाश रोजतकर, काशीनाथ इंगळे, श्री.रामदास सावकारे,श्री.अशोकमामा सावकारे ,ॲड,श्री.विश्वासराव मोतीवाले,श्री.संजय निंभोरे सर,श्री.कमलाकर ठोसर, नगरसेविका सौ. सुरेखाताई तायडे, श्री सुरेश गाडेकर,सुखदेव काटकर,श्री. खंडू पवार, श्री. विजय पवारसाहेब, श्री. मनोजभाऊ सोनवणे, श्री. कैलास वाघ, प्रा.सौ.स्मिताताई जयकर,सौ.उज्वला वाडेकर,श्री. अशोक भारुळे, श्री. रतीराम सावकारे, श्री.गजानन दांडगे,श्री.निवृत्ती सूर्यवंशी,श्री.केशव ठोसरे,,श्री. संदीप ठोसर तसेच अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.

 

कार्यक्रमाची सुरुवात संत रविदास महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.

मेळाव्याचे प्रास्ताविक श्री. संजयजी खामकर व डॉ. संजय भटकर यांनी केले. या प्रसंगी समाजाच्या विवाह क्षेत्रातील आधुनिकतेच्या दिशेने एक पाऊल म्हणून ‘ऋणानुबंध’ या डिजिटल पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

 

या मेळाव्यात विवाहित, घटस्फोटित, विधवा-विधुर तसेच अपंग वधू-वरांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. सर्व वधू-वरांना आपला परिचय देण्याची सुवर्णसंधी मिळाली.

मान्यवरांनी समाजातील या उपक्रमाचे मन:पूर्वक कौतुक करताना, गुरु रविदास महाराजांचा भव्य पुतळा आणि सभागृह बांधणीसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच युवकांनी फक्त नोकरीच्या मागे न लागता उद्योजकतेच्या दिशेने वाटचाल करण्याचे आवाहन केले.

 

या यशस्वी कार्यक्रमासाठी श्री. विश्वनाथ सावकारे, श्री. संजय वानखेडे, अॅड. डॉ. अर्जुन भारुडे, प्रकाश रोजतकर, कमलाकर ठोसर, श्री. राजेश वाडेकर, मनोज भाऊ सोनवणे, सौ. ज्योतीताई निंभोरे, श्री. गणेश काकडे, श्री. डी. बी. मोरे, श्री. गजानन दांडगे, श्री. संदीप ठोसर, सौ. योगिता वानखेडे, सौ. सुनीता वानखेडे, लता सावकारे, प्रा. संदीप शेकोकार, श्री. पंकज तायडे, श्री. शिवदास कळसकर, सौ. उषाताई दांडगे, श्रीमती संगीता चिमणकर, श्री. यशवंत वानखेडे, श्री. भागवत सावकारे, श्री. प्रवीण बाविस्कर, श्री. लोकेश भारुडे, श्री. सुजल सावकारे, श्री. रोहित सावकारे, श्री. पुरुषोत्तम चिमणकर आदींनी परिश्रम घेतले.

 

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संजय वानखेडे सर, प्रा. धनराज भारुडे आणि डॉ. संजय भटकर यांनी अत्यंत प्रभावीपणे केले, तर अॅड. डॉ. अर्जुन भारुडे यांनी आभारप्रदर्शन केले.

 

 

 

बातमी शेअर करा !
Previous Post

नगरपरिषद नगरपंचायत च्या निवडणुका जाहीर.

Next Post

श्रमिक कामगार सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी रामकृष्ण काटोले

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
श्रमिक कामगार सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी रामकृष्ण काटोले

श्रमिक कामगार सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी रामकृष्ण काटोले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif