नवराज्य live न्यूज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी – निवडणूक आयोगाने काल निवडणुकीची घोषणा केल्यानंतर आज शहरभर पोलीस यंत्रणा पूर्णपणे ऍक्शन मोडवर दिसून येत आहे. जळगाव शहरातील वरदळीचे ठिकाण असलेले नेहरू चौक परिसरात पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर तपासणी मोहीम हाती घेतली आहे.
चारचाकी वाहनांची काटेकोर तपासणी सुरू असून, संशयास्पदरीत्या वावरणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर ठेवून आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस दल सतर्क झालं आहे.
दरम्यान, शहरातील इतर महत्त्वाच्या चौकांतही पोलिसांची गस्त वाढवण्यात आली असून, वाहनतपासणी दरम्यान नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. पोलीस प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.







