जळगाव – राज्य निवडणूक आयोगाने अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2025 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये 246 नगरपरिषद आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत.
घोषित कार्यक्रमानुसार — अर्ज दाखल करण्यास सुरुवात: 10 नोव्हेंबर
अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख: 17 नोव्हेंबर
अर्जांची छाननी: 18 नोव्हेंबर
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: 25 नोव्हेंबर
मतदान: 2 डिसेंबर
मतमोजणी: 3 डिसेंबर
या निवडणुका राज्यातील स्थानिक स्वराज्य व्यवस्थेला नवसंजीवनी देणार असून, राजकीय पक्षांसाठी ही एक मोठी कसोटी ठरणार आहे. अनेक नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये सत्तेचा ताबा मिळवण्यासाठी प्रमुख पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत.






