इलेक्ट्रिक बाईक चार्जरचा शॉक लागल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी अंत.
पारोळा – शहरातील शिव कॉलनी परिसरात दीड वर्षाचा बालक पोर्चमध्ये खेळत असताना इलेक्ट्रिक स्कूटर चार्जरचा शॉक लागल्याने बाळाचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक २ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील प्रतापसिंह राठोड रा. शिव कॉलनी, पारोळा यांची मुलगी शुभांगी दिवाळीनिमित्त आई-वडिलांकडे आलेली होती आज दि. २ रोजी सहा वाजेच्या सुमारास तिचा दीड वर्षाचा मुलगा विश्वा सुरेश चौधरी रा. मालेगाव जि. नाशिक हा आपल्या घरातील पोर्चमध्ये खेळत असताना बाजूला असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरचे चार्जर जवळ त्याला जोरदार शॉक लागल्याने तो बेशुद्ध अवस्थेत पडला त्याला लगलीच कुटीर रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी पारोळा पोलिसात प्रकाश राठोड यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.







