• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

पत्रकार यांच्यावर तिघांचा प्राणघातक हल्ला

हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद ; शहरातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
November 2, 2025
in Uncategorized
पत्रकार यांच्यावर तिघांचा प्राणघातक हल्ला
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

जळगाव प्रतिनिधी –  शहरातील प्रसारमाध्यम क्षेत्रात खळबळ उडवणारी घटना आज  दुपारी घडली आहे.  दै. लोकशाही या वृत्तपत्रात कार्यरत असलेले वरिष्ठ पत्रकार दीपक कुलकर्णी यांच्यावर तीन अज्ञात व्यक्तींनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी सुमारे ३.३० वाजेच्या सुमारास दीपक कुलकर्णी हे बळीराम पेठ येथील लोकशाही कार्यालयात पायी जात होते. त्याचवेळी मागून आलेल्या तीन जणांच्या टोळक्यांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. आरोपींपैकी एकाने हातातील काचेची बॉटल त्यांच्या मानेवर फेकत मारली. सुदैवाने कुलकर्णी यांनी प्रसंगावधान राखून स्वतःचा बचाव केला, तरीदेखील त्यांच्या मानेवर आणि खांद्यावर गंभीर दुखापत झाली आहे.

 

घटनेनंतर उपस्थित नागरिकांनी तात्काळ कुलकर्णी यांना जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले, जेथे त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. उपचारानंतर त्यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलीसांनी गुन्ह्याची नोंद घेत पुढील तपास सुरू केला आहे.

 

प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, हल्ला करणारे संशयित तिघेही घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत स्पष्टपणे कैद झाले आहेत. पोलिसांकडून या फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू असून, हल्ल्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

 

या घटनेमुळे पत्रकार वर्तुळात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. पत्रकार संघटना व सहकारी पत्रकारांनी हल्लेखोरांवर कडक कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, शहरात वाढत्या पत्रकार हल्ल्यांच्या घटनांबद्दलही गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.तर वाढत्या गुन्हेगारी मुळे कायदा सुव्यवस्था ढसाळली आहे.

बातमी शेअर करा !
Previous Post

अमळनेर तालुक्यात २२ हजार ९५९ संभाव्य दुबार मतदार

Next Post

इलेक्ट्रिक बाईक चार्जरचा शॉक लागल्याने चिमुकल्याचा अंत.

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
इलेक्ट्रिक बाईक चार्जरचा शॉक लागल्याने चिमुकल्याचा अंत.

इलेक्ट्रिक बाईक चार्जरचा शॉक लागल्याने चिमुकल्याचा अंत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif