नवराज्य डिजिटल न्यूज नेटवर्क
जळगाव : सेवा पंधरवड्यानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा जळगाव तर्फे आज, रविवार रोजी ‘नमो युवा रन’ या भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचा निकाल घोषित झाला असून युवकांमधून मधून अनिल जाधव तर युवतीमधून जानवी रोजोदे यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून द्वितीय क्रमांक तेजस कोळी, साक्षी महाजन यांनी पटकावला मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर.खा. स्मिताताई वाघ, आ. सुरेश दामू भोळे (राजुमामा), जिल्हाध्यक्ष . दीपक सूर्यवंशी आदींच्या
भाजप युवा मोर्चा पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी राजेंद्र नाईक, ऍथलेटिक्स असोसिएशन सचिव राजेश जाधव व इकबाल मिर्झा उपस्थित होते.
“नशामुक्त भारत – आत्मनिर्भर भारत – युवा भारत” या घोषवाक्याने युवक-युवतींनी सहभाग नोंदवत फिटनेससोबत सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला. या स्पर्धेचे औचित्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्ताने साधण्यात आले. सकाळी शहरातील प्रमुख मार्गांवर युवक-युवतींच्या उत्साहाने मिरवणुकीचे स्वरूप घेतले होते.
या भव्य कार्यक्रमाला मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्रजी चव्हाण, राज्याचे मंत्री मा. गिरीशभाऊ महाजन, खा. स्मिताताई वाघ, आमदार मा. सुरेश दामू भोळे (राजुमामा), आ. मंगेश चव्हाण, जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी आदींच्या मार्गदर्शनाचे लाभ मिळाले.
मॅरेथॉन स्पर्धेचा निकाल युवक- विजयी स्पर्धक
अनिल जाधव – प्रथम,
तेजस कोळी – द्वितीय,
अय्यान खान- तृतीय,
जयपाल पावरा -चतुर्थ,
गुंजन चौधरी -पाचवा क्रमांक पटकावला.
मॅरेथॉन स्पर्धेचा निकाल युवती – विजयी स्पर्धक
जानवी रोझोदे – प्रथम
साक्षी महाजन – द्वितीय
जानवी सपकाळे – तृतीय
लक्ष्मी खंडारे – चतुर्थ
मथुरा वसावे – पाचवा क्रमांक पटकावला.
‘नमो युवा रन’ चे संयोजक रोहित सोनवणे तर सहसंयोजक हितेश राजपूत, आकाश मोरे, उन्मेष चौधरी यांच्यासह कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. उपस्थित मान्यवरांनी जळगावच्या युवा शक्तीच्या जोशाचे कौतुक केले.







