• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home आपत्ती

बाळद परिसरात पावसाचा कहर; तितुर नदीला महापूर

बाळत गावाला पाण्याचा वेढा; पाचोरा व चाळीसगाव चा संपर्क तुटला, जनजीवन विस्कळीत.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
September 22, 2025
in आपत्ती, जिल्हा
बाळद परिसरात पावसाचा कहर; तितुर नदीला महापूर
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य डिजिटल न्यूज नेटवर्क

(भडगाव बाळद ) –  बाळद परिसरात रविवारी मध्य रात्रीपासून मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. विजांच्या कडकडाटासह सुरू असलेल्या या पावसामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाचा जोर सतत वाढत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

 

तितुर नदीच्या पाण्यात झपाट्याने वाढ होत असल्याने नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने तातडीने सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन केले आहे. तसेच गुरेढोरे नदीकाठावर बांधलेली असल्यास त्वरित सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी स्वतःची व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासन व स्थानिक प्रतिनिधींनी केले आहे.

 

दरम्यान, नुकतीच मिळालेल्या माहितीनुसार बाळद गावाला चौफेर पाण्याने वेढा दिला असून गावाशी संपर्क साधणे कठीण झाले आहे. सध्या गावात येण्यासाठी केवळ भडगाव मार्गच खुला असून पाचोरा व चाळीसगाव मार्ग पूर्णपणे बंद झाले आहेत. पाचोरा मार्गावरील झोडप नाल्याला महापूर आल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. तर, चाळीसगाव मार्गावरील कसारा नाल्याला महापूर आल्याने तो रस्ता देखील बंद करण्यात आला आहे.

 

बाहेरगावाहून बाळद गावात येणाऱ्या नागरिकांनी पाचोरा व चाळीसगाव मार्ग टाळावा व केवळ भडगाव मार्गेच प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून प्रशासनाकडून सतत लक्ष ठेवले जात आहे.

बातमी शेअर करा !
Previous Post

जळगावात ‘नमो युवा रन’ मॅरेथॉन स्पर्धा हजारो युवकांचा सहभाग .

Next Post

शिरसोली येथील गर्भवती मातेच्या आत्महत्याप्रकरणी ६ जणांवर गुन्हा दाखल 

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
शिरसोली येथील गर्भवती मातेच्या आत्महत्याप्रकरणी ६ जणांवर गुन्हा दाखल 

शिरसोली येथील गर्भवती मातेच्या आत्महत्याप्रकरणी ६ जणांवर गुन्हा दाखल 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

September 5, 2026
युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif