नवराज्य डिजिटल न्यूज नेटवर्क
जळगाव – भारत विकास परिषदेतर्फे दि 20 रोजी आयोजित “भारत को जानो” प्रश्नमंजुषा व राष्ट्रीय समूह गान या प्रतिष्ठित स्पर्धेत इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल, पाळधी. येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले.
भारत को जानो प्रश्नमंजुषा (मोठा गट) या स्पर्धेत इम्पिरियल स्कूलचे विद्यार्थी यश मनोहर चौधरी व धन्वी योगेश बडगुजर यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेत लहान गट व मोठा गट मिळून सुमारे 30 शाळांचा सहभाग होता. विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती, इतिहास, भूगोल व समाजजीवनावरील आपले ज्ञान प्रभावीपणे मांडले.
तसेच समूह गाण्यातून विद्यार्थ्यांनी देशभक्तीची भावना जागवून एकात्मतेचा संदेश दिला. परीक्षकांनी त्यांच्या सादरीकरणाचे कौतुक करून त्यांची मने जिंकली.
या यशात शाळेचे चेअरमन इंजि. नरेश चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेचे MD श्री. जी. डी. पाटील, प्राचार्य, शिक्षक व पालकवर्ग यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या स्पर्धेत शिक्षिका रोहिणी सोमानी यांचे योगदान मोलाचे ठरले.







